ताजमहल – का म्हणता याला प्रेमाचं प्रतीक ? | Tajmahal Information in Marathi 2023

काय आहे ताजमहल याचा खरा इतिहास? Tajmahal Information in Marathi का म्हणता याला प्रेमाचं प्रतीक?
जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Tajmahal Information in Marathi

ताजमहल - का म्हणता याला प्रेमाचं प्रतीक ? | Tajmahal Information in Marathi 2023

जगामध्ये सर्वात सुंदर असेल तर ते प्रेम असतं, खरंतर हे प्रेम युगेन युगे , विश्वासाचं साक्ष देत आणि इतिहास रचत आलेला आहे. प्रेमाचे प्रतीक असलेलं जगातील सात आश्चर्यांमध्ये समाविष्ट असलेलं ताजमहाल हे, त्याच्या सुंदरतेमुळे आणि भव्यतेमुळे जगामध्ये ओळखल्या जाते. खरंतर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि प्रेमाचं साक्ष म्हणून प्रेमाची आठवण म्हणून हे ताजमहल मुघल बादशहा शहाजहान याने आपली पत्नी मुमताज यांच्या आठवणीमध्ये बांधले होते.

या ताजमहालाची आर्किटेक्चरल शैली ही पर्शियन तसेच ओट्टोमन, भारतीय आणि इस्लामिक आर्किटेक्चरच्या अनेक समिश्रित घटकांचा अनोखा अजूबा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1883 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ताजमहलाला एक महत्त्वाचे स्थान आहे.
एवढंच नाही तर जगात सर्वात्कृष्ट मानवाचे उत्तम कार्यापैकी एक कार्य म्हणून याचे वर्णन केले जाते.

ताजमहालच्या बांधकामाचा उद्देश काय होता? (What was the purpose of construction of Taj Mahal in Marathi?)

ताजमहल Tajmahal Information in Marathi 2023

ताजमहल बांधण्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे शहाजहाची पत्नी मुमताज तिची आठवण होय. शहाजहान हा त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करत होता. जी पर्शियन राजघराण्यातील होती. मुमताज आणि शहाजहान चे ३० एप्रिल १६१२ रोजी लग्न झाले. मात्र मुमताज जेव्हा तिच्या चौदाव्या होणाऱ्या मुलाला जन्म देत होती .तेव्हा तिचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला. मात्र या गोष्टीला शहाजहाने अतिशय गंभीरतेने घेऊन तिच्या आठवणीमध्ये ताजमहल बांधून त्याच्या प्रेमाची साक्ष दिली.

मकबरा

ताजमहालच्या मध्यभागी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी एक सर्वात महत्वपूर्ण टॉवर आहे .जो चौकोनी असलेल्या मुख्य पायावर बांधला गेला आहे. चारी बाजूला समांतर असलेले सममितीय इमारत असे देखील याला म्हटले जाते. इतकेच नाही तर त्याला ज्यास इव्हान असे देखील म्हटले जाते. ज्यास विभाग याचा प्रत्यक्ष पणे अर्थ पाहिला तर , विशाल असलेलं कमानी वक्र, ज्यालाच आपण गेट म्हणतो.

ताजमहल याची सीमा आग्रा शहराच्या दक्षिणेला असलेल्या छोट्या जागेवर म्हणजेच एक छोट्याशा पठारावर बांधला गेलेला आहे. तेथील राजा शहाजहान यांनी जयसिंग याला आग्रा शहराच्या मध्यभागी असलेला वाडा दिला. ते बांधण्यासाठी तीन एकर क्षेत्र सहजच खोदल्या गेले होते. नदीच्या पृष्ठभागाला कचरा भरून उंच करण्यात आले होते. जेणेकरून सिलिंग निर्माण करण्यासाठी सोपे जाईल या महत्त्वपूर्ण उद्देशाने.
खरंतर हे इतक भव्य बांधण्यात आले आहे की ,जर कोणी याचा काढण्याचा प्रयत्न करत असेल. किंवा याला तोडण्याचा प्रयत्न करत असतील तर हे फक्त काढण्यासाठीच अनेक वर्ष लागतील.

या प्रक्रियेसाठी एकूण बारा वर्षे उलटून गेली.तरीही या इमारतीचे काम पूर्ण झालेले नव्हते. उर्वरित जी इमारत त्यांनी बांधण्यासाठी अपूर्ण ठेवली होती ती, पुढील दहा वर्षांनी पूर्ण झाली यामध्ये सर्वप्रथम मिनारे, मशीद ,जबाब आणि सर्वात शेवटी असलेला मुख्य दरवाजा या सर्व गोष्टींचा समावेश होतो. या सर्व गोष्टींना तयार करण्यासाठी अनेक घटकांचा उपयोग केला गेला. आणि हा तयार करण्यासाठी अनेक वर्ष आणि टप्पे लागल्यामुळे हा कधी समाप्तीला आला म्हणजे बनून पूर्ण झाला याची कल्पनाही आपण करू शकत नाही. त्यामुळे याच्या निर्मितीची आणि समाप्तीची कुठलीच तारीख मुख्य तारीख म्हणून सांगता येत नाही.

ताजमहल बनवण्यासाठी संपूर्ण आशिया खंड या खंडामध्ये आढळणाऱ्या अनेक साहित्य यांचा उपयोग केला गेला आहे. ताजमहल बांधण्यासाठी एक हजार पेक्षा जास्त हत्तींचा वाहतुकीसाठी उपयोग केला गेला. इतकच नाही तर पांढरा संगमरवर राजस्थानातून, पंजाब येथून आणले गेले. तर क्रिस्टल हे चीन मधून आणला गेला होता. 28 प्रकारची सर्वात मौल्यवान दगड आणि रत्ने याचा उपयोग यासाठी केला गेला.

ताजमहल बांधण्यासाठी एकूण 20000 मजुरांची ही फौज सतत रात्रंदिवस कार्यरत होती .इतकच नाही तर बुखारा येथील असलेले स्थायिक कारागीर सीरिया आणि इराणचे सुलेखक, भारतामध्ये असलेले मोजकेच कारागीर यामध्ये समाविष्ट होते.
सृष्टी युनिट तयार करण्यासाठी 27 कारागीरांपैकी काही कारागीर या कार्यासाठी सतत कार्यरत होते. परंतु ताजमहल कसा बांधला गेला पाहिजे, याची कल्पना देणाऱ्या कारागिरांचे एक विशेष स्थान आणि त्यांचे विशेष नाव यासाठी घेतले जाते.

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Avatar
Marathi Time

Leave a Reply