Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 107

Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 180

आठवणीतली सहल by सौ सुवर्णा बाबर | Thanditil Sahal Nibandh Marathi 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेतसौ सुवर्णा बाबर यांनी Thanditil Sahal Nibandh Marathi या कीवर्ड वर आधारित “आठवणीतली सहल” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

साप्ताहिक उपक्रम क्र. १०

लेख विषय :- हिवाळ्यातील अविस्मरणीय सहल

आठवणीतली सहल | Thanditil Sahal Nibandh Marathi


“सहल” प्रचंड आवडीचा विषय. तसा तो तुम्हा सर्वांच्याही आवडीचा विषय असावा. हो ना? असणारच ना. कोणाला नाई आवडणार फिरायला.
कौटुंबिक सहल असो, मित्र-मैत्रिणीं सोबत किंवा मग कधीतरी आपली एकट्याची असो. प्रत्येक सहलीची मजा काही औरच असते ना.

आठवणीतली सहल | Thanditil Sahal Nibandh Marathi

तश्या आत्ता पर्यंत माझ्या बऱ्याच सहली झाल्या. पण मनात घर करून राहिली माझी कॉलेज मधील सहल. मी पदवी शिक्षण घेण्यासाठी मुलींचे वसतिगृहात रहात होते. कॉलेज च्या द्वितीय वर्षी ऑक्टोबर महिन्या मध्ये आमच्या संगणक विभाग च्या विद्यार्थ्यांसाठी सहलीची सुचना सुचना-फलक वर लिहिली. सर्व मुलांनी ती वाचली आणि मग काय सगळी कडे सहलीचे वरे वहायला लागले. सर्व मुला- मुलीं मधे फक्त एकच चर्चा रंगली होती. सहल कुठे जाणार, सहलीला कोण कोण येणार, किती दिवसांची असेल वैगरे वैगरे… आणि एकदा ची सहलीची इत्मभूत माहिती मिळाली. एक, दोन दिवस नाही तर तब्बल अकरा दिवसांची सहल. आधी तर हे स्वप्नचं वाटलं. पण हे खर होतं नक्की.

आठवणीतली सहल | Thanditil Sahal Nibandh Marathi

एवढे दिवसांची सहल म्हणजे मग तयारी पण तशीच होती. सहलीचा दिवस जवळ येतं होता तशी अधिकाधिक उत्सुकता वाढत होती आणि तयारीला ही चांगलाच वेग आला होता. डिसेंबर महिन्या च्या २३ तारखेला सहलीचे प्रस्थान होणार होते.

आमचा ७ मैत्रिणींचा एक गृप होता. आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं होता की कोणी काय काय खाऊ घ्यायचा. मग एकीने चिवडा, एकीने शंकरपाळी, एकीने नमकीन अस बरंच काही.

तयारी करता करता शेवटी तो दिवस उगवला. आम्ही ७ मैत्रिणी आणि आमचं सामान थंडीचे कपडे, शाॅल, साॅक्स, स्कार्फ, एवढा मोठा खाऊ असा सगळा बोऱ्या-बिस्तरा, लवा-जमा घेऊन आमच्या सहलीचा श्री गणेशा झाला. गणपती बाप्पा मोरया म्हणुन आमची बस निघाली. माझ्या वर्गातले मित्र, मैत्रिणी, ३ सर आणि आमच्या मॅडम असा आमचा प्रवास सुरू झाला.

आठवणीतली सहल | Thanditil Sahal Nibandh Marathi

थंडीचे दिवस, उगवता सूर्य, रस्त्याच्या दुर्तफा पाळणारी झाडं, मागे पडणारा रस्ता, आणि अंगाला झोंबणारा गरवा. गप्पा गोष्टी करत प्रवास मस्त सुरू होता. कधी गाण्याच्या भेंड्या, कधी डान्स, कधी छोट्या छोट्या गेम्स खेळत मजेत सर्व जण सहलीचा आनंद घेत होते.

विजापूर, हम्पी, हाॅस्पेट, बेंगलोर, मैसूर, श्रीशैलम्, हैद्रबाद अशी सगळी प्रेक्षणीय स्थळे पाहायला खूप आनंद होत होता. कडाक्याची थंडी, एक रात्र मुक्काम, एक रात्र पूर्ण प्रवास, कधी धर्म शाळेत तर कधी यात्री निवास मध्ये मुक्काम अशी सगळी गंमत जम्मत सुरू होती.

आठवणीतली सहल by सौ सुवर्णा बाबर | Thanditil Sahal Nibandh Marathi 2024

आठवणीतली सहल | Thanditil Sahal Nibandh Marathi

दक्षिणे कडचा भाग असल्याने रोज नाश्ता आपला इडली, डोसा. जेवण ढाब्यावर. असा एकंदरीत आमचा सगळा प्रवास सुरू होता. रोज एक नवीन ठिकाण, रोज नवा निसर्ग, रोज नवी धावपळ, रोज नवा प्रवास……

नवीन ठिकाणांची नवलाई, उस्तुकता यामुळे थंडी चा कुठे लवलेशही राहिला न्हवता. १० दिवस कसे गेले समजलंच नाही. आणि परतीचा प्रवास सुरू झाला. गम्मत अशी झाली की तिकडे सगळे कन्नड, तेलगू बोलणारे ना. त्यांना मराठी समजतच न्हवतं. मग आम्ही हिंदीतून बोलायचोत. आणि झालं असं की १० दिवसांमधे पूर्ण हिंदी बोलू लागलो. आपण महाराष्ट्र मधे आलो आहे हे समजलंच नाही. कुठे जेवणासाठी थांबलो तर आम्ही हिंदी तून आणि ते मराठीत बोलत. तेव्हा लक्षात आलं आपण आलो आहोत महाराष्ट्र मधे.

आठवणीतली सहल | Thanditil Sahal Nibandh Marathi

हे लक्षात येताच सहल संपली याची जाणीव झाली आणि मग मन नाराज झालं. पण आनंद हा होता की खूप छान छान आठवणी मनात साठवून घरी परतणार होतो.

या सहलीला आज २१ वर्षे झाली. पण आज ही तशी, तेवढीच मनात घरी करून राहिलीले माझी आठवणीतली सहल.


सौ सुवर्णा बाबर
पुणे

आठवणीतली सहल | Thanditil Sahal Nibandh Marathi

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या

mazablog.online

नवीन लेख वाचण्यासाठी भेट द्या

https://marathitime.in/

Author

Marathi Time

Leave a Reply