वाढदिवस शुभेच्छा दिल्याबद्द्ल आभार | 20+ Thank You Message in Marathi

वाढदिवस हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील दरवर्षी येणारा सुंदर दिवस. त्यामुळे आपले प्रेमीजन, आप्तेष्ट आपल्याला या दिवसाच्या अनेक शुभेच्छा देतात. अश्यावेळी फक्त Thank You Message in Marathi देऊन कटावणे चांगले वाटत नाही. कारण काहीजण आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी चांगलीच मेहनत घेतात. कुणी युनिक कविता शोधत, कुणी banner तयार करून पाठवतात तर कुणी vdo बनवून स्टेटस ठेवतात. आता इतके मेहनत घेतल्यावर आपला सुद्धा आभार व्यक्त करणारा मेसेज युनिक हवा न ? चला बघूया Thank You Message in Marathi.

Thank You Message in Marathi

वाढदिवस शुभेच्छा दिल्याबद्द्ल आभार | 20+ Thank You Message in Marathi

____________________________

तुम्ही सर्वांनी मनातून दिलेल्या शुभेच्छा, या अनमोल भेटवस्तूपेक्षाही महान आहेत.

____________________________

माझ्या “वाढदिवसानिमित्त” तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद स्वरूपी शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते.

____________________________

आज माझ्या “वाढदिवशी” म्हणजेच माझ्या स्पेशल दिवशी तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचा वर्षाव झाला, इतकच नाही तर या शुभेच्छा मुळे माझा आनंद द्विवेणी झाला ,तुम्ही तुमचा किमती वेळ मला दिला ,त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानते.

____________________________

आज तुम्ही सर्वांनी माझ्या “वाढदिवसानिमित्त” थोर मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद यासर्वांन बद्दल मी सर्वांचे आभारी आहे. असाच तुम्हा सर्वांचा माझ्या डोक्यावर आशीर्वाद राहावं आणि तुमचं प्रेम माझ्यावर असंच बरसत राहो हीच इच्छा व्यक्त करते.
धन्यवाद

____________________________

वाढदिवस हा एकाच दिवसाचा प्रसंग असला तरी आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत कायमच राहते माझा आजचा दिवस खास केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद

वाढदिवस शुभेच्छा दिल्याबद्द्ल आभार | 20+ Thank You Message in Marathi

____________________________

आज माझा वाढदिवस आणि तुम्हा सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा वाचून मला अत्यंत आनंद झालाय, त्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानते , ज्यांनी मला वेळातला वेळ काढून विश केले यांचे मी मनापासून आभार मानते.
धन्यवाद..!

____________________________

माझ्या जीवनातील तुम्ही एक महत्त्वपूर्ण भाग आहे, तुमच्याशिवाय माझा वाढदिवस अपूर्णच!
तुम्ही सर्व एकत्र येऊन माझ्या वाढदिवसाला खूप खास बनवलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते .
धन्यवाद….!

____________________________

तुम्ही सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या या अनमोल शुभेच्छा मला कुठल्याच गोष्टी ची गरज भासू देत नाही,
कोणताच केक त्यापेक्षा गोड नाही, आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशापेक्षा जास्त चमकदार आहे ते म्हणजे तुमच्या शुभेच्छा!.

____________________________

वाचा Quotes On Life In Marathi

वाचा Romantic Marathi Prem Kavita

Birthday Thank You Message in Marathi

____________________________

वाढदिवस शुभेच्छा दिल्याबद्द्ल आभार | 20+ Thank You Message in Marathi

आज माझा वाढदिवस होता त्याबद्दल तुम्ही अनेकांनी सोशल मीडियाद्वारे, तर कोणी व्हाट्सअप ,तर कोणी इन्स्टा वर, माझी स्टोरी ठेवून मला शुभेच्छास्वरूपी आशीर्वाद दिला आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते
धन्यवाद…!

____________________________

वाढदिवसानिमित्त विविध प्रकारच्या दिलेल्या भेटवस्तू तुटू शकतात ,पण तुम्ही वाढदिवसानिमित्त दिलेल्या आशीर्वाद स्वरूपी शुभेच्छा कधीच तुटू शकत नाही, ते सदैव माझ्या पाठीमागे राहील तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.

____________________________

तुम्हा सर्वांनी वेळातला वेळ काढून दिलेल्या शुभेच्छा या माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही! पण जीवनाच्या वाटेवर तुम्ही दिलेल्या शुभेच्छा नेहमी आशीर्वाद स्वरूपी माझ्या पाठीमागे राहील आणि तुम्हा सर्वांचे प्रेम माझ्यासाठी असेच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते,
तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार…!

____________________________

वाढदिवस शुभेच्छा दिल्याबद्द्ल आभार | 20+ Thank You Message in Marathi

Birthday Thank you message Marathi

____________________________

आयुष्यामध्ये पैसा महत्त्वाचा नसतो आयुष्यामध्ये असतात महत्त्वाच असत ते म्हणजे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि ते मला आज भेटस्वरूपी “वाढदिवसानिमित्त” मिळाले आहेत तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार..!

____________________________

आज माझा वाढदिवस आणि आजच्या दिवशी मला थेट बारा वाजता विश करून स्,वतःची झोप मोड करून ,मला शुभेच्छा दिल्याबद्दल
तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार!..

____________________________

वाढदिवस म्हटलं की स्वतःसाठी असलेला खास दिवस ,आणि आजच्या या खास दिवसाला तुम्ही आणखी खास करून स्पेशल बनवल्याबद्धल माझ्या सर्व बंधूंनचे मनापासून खूप खूप आभार मानते!

____________________________

तुम्ही दिलेल्या शुभेच्छा ,तुमचा विश्वास ,तुमचे प्रेम, आणि तुमचं हे स्नेह ,याचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम राहील तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी तुम्हा सर्वांच्या ऋणी आहे .
सर्वांचे मनापासून खूप खूप आभार..!

____________________________

आज माझ्या “वाढदिवसानिमित्त”
लहान मुलांनी मोठ्या व्यक्तींनी आणि वरिष्ठांनी देखील मला विश करून शुभेच्छा दिल्यात खरंतर आज मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे की तुम्ही सर्व मला वेळातला वेळ काढून शुभेच्छा स्वरूपी मौल्यवान आशीर्वाद देत आहात.
तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानते..!

वाढदिवस शुभेच्छा दिल्याबद्द्ल आभार | 20+ Thank You Message in Marathi

____________________________

वाढदिवस माझा होता, परंतु “हर्ष” हा तुम्हा सर्वांना होता, खर तर मी खरंच खूप भाग्यवान आहे की तुम्हा सर्वांसारखे मित्र मैत्रिणी माझ्या आयुष्यात आले, इतकच नाही तर मला आनंदी पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी इतकं सुंदर सप्राईज प्लॅन केलं ,मला आनंद व्हावा यासाठी तुम्ही तुमचे महत्त्वाचे काम सोडून माझ्या आनंदामध्ये आनंदी होण्यासाठी आले, यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काय असेल, तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार..!

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Avatar
Marathi Time

Leave a Reply