Tooth Pain Home Remedy In Marathi अचानक कधीतरी दात दुखीचा त्रास आपल्यापैकी सर्वांना होतो. साधारणपणे दाताला कीड लागल्यामुळे किंवा गोड पदार्थ जास्त खाण्यात आल्यामुळे दात दुखतात. त्यावर पुढील काही घरगुती उपाय आम्ही सांगणार आहोत. ते घरगुती उपाय केल्यामुळे नक्कीच तुम्हाला आराम मिळेल.
Tooth Pain Home Remedy In Marathi
नमस्कार मित्रांनो या लेखांमध्ये पुढे दिलेली संपूर्ण माहिती वाचा, जेणेकरुन संपूर्ण माहिती वाचल्यावर तुम्हाला समजेल की दात दुखीवर घरगुती कोणते उपाय करावेत.

दात दुखीवार उपाय गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा Remedy for toothache Gargle with salt in hot water
मीठ हा पदार्थ नैसर्गिक जंतुनाशक आहे. मिठ हे जंतुनाशक असल्यामुळे दातावरील किटाणू मारण्यास मदत करते. मिठाच्या पाण्याने चूळा भरल्यामुळे थोड्या प्रमाणात दात दुखत असतील किंवा दाताच्या खिंडीमध्ये काही पदार्थ अडकून दात दुखत असतील तर त्यावर आराम मिळतो. तुम्ही बरेच वेळा डॉक्टरांकडून देखील हा उपाय ऐकला असेल. या उपायामुळे अनेकदा फरक पडतो. हा उपाय करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून तोंडात चूळ भरून घ्यावी व तोंडात घुसळावे. असेच तीन चार वेळा करावे व नंतर ते पाणी थुंकून टाकावे. हा उपाय केल्याने तुम्हाला शंभर टक्के फायदा मिळेल व नक्कीच तुमची दात दुखी कमी होण्यास मदत होईल.
Tooth Pain Home Remedy In Marathi
दात दुःखीवर लवंग उपाय
आपल्याकडे लहाना पासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच माहित आहे, लवंग चा दात दुखीवर हमखास उपाय, दात दुखी सुरू झाली की लगेच दात दुखीवर लवंग वापरण्यास सांगितले जाते.
लवंग मध्ये अँटीबॅक्टीरियल व अँटीसेप्टिक चे गुण आढळतात जे दात दुखीवर होणारा त्रास कमी करण्यास मदत करतात.
Tooth Pain Home Remedy In Marathi
पेरूची पाने दात दात दुःखीवर उपाय
पेरूची पाने मीठ टाकून स्वच्छ धुऊन घ्या. नंतर ते धुतलेली पाने उकळण्यासाठी पाण्यात टाका. उकळून घेतल्यानंतर ती उकळलेले पाने काढून टाका, व पाणी कोमट झाल्यानंतर त्याची चूळ भरा असे दिवसातून चार-पाच वेळेस करा. तसेच हे शक्य नसल्यास पेरूचे चार-पाच पाने स्वच्छ धुऊन घ्या व ते ज्या साईडचे दात दुखत आहेत त्या दाताखाली चावा
कारण पेरूच्या पानांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आढळतो. ते गुणधर्म दातदुखीमध्ये आराम देण्यास मदत करतात आणि दातमध्ये आलेली सूज कमी करण्यास मदत करतात.
Tooth Pain Home Remedy In Marathi
दात दुःखीवर तुळस रामबाण उपाय
दात दुखीवर उपाय म्हणून तुळस हा रामबाण उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला तुळशीचे चार-पाच पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. आणि ती दाताखाली चावायची आहेत. यामुळे नक्कीच फरक जाणवतो व दुसरा उपाय म्हणजे स्वच्छ धुतलेली पाने व लवंग याचा गोळा करून दुखत असलेल्या दाताखाली काही वेळेसाठी धरा तुम्हाला नक्कीच या उपायाने आराम मिळेल.
दात दुखीवर बर्फ मदत करतो
अनेकदा आपल्याला डॉक्टर कशाही प्रकारची सूज असेल तर त्यावर बर्फ लावण्याचा उपाय सांगतात. तोच उपाय आपल्याला येथे करायचा आहे. ज्या साईटचे दात दुखत आहेत त्या साईडला बाहेरून एक बर्फाचा तुकडा लावा, खूप वेदना होत असतील तर अनेक वेळा हा उपाय करा तुम्हाला नक्की आराम मिळेल.
Tooth Pain Home Remedy In Marathi
दात दुखीवर कांदा उपाय
कांदा केवळ कांदा पोह्या मध्येच स्वाद आणत नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप उपयोगी ठरतो. दात दुखीवर घरगुती उपायांमध्ये कांदा देखील रामबाण उपाय आहे. तो उपाय करण्यासाठी पुढील कृती करा, सर्वप्रथम कांद्याची साल काढून त्याचे तुकडे दातावर ठेवता येतील एवढ्या प्रमाणात कांदा बारीक कापून घ्या नंतर तो स्वच्छ धुऊन घ्या, तो स्वच्छ धुतलेला तुकडा आपला जो दात दुखत आहे त्या दाता वर थोड्या वेळासाठी ठेवा. व नंतर तो फेकून द्या असेच दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा. कांदा पोटात गेल्यामुळे त्याचे काही दुष्परिणाम देखील होत नाहीत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त हा उपाय करू शकता.
Tooth Pain Home Remedy In Marathi
बेकिंग सोडा दात दुःखीवर उपाय
बेकिंग सोडा यामध्ये जिवाणनाशक व इतर दातावरील किटाणू तसेच तोंडावरील बॅक्टेरिया नष्ट करण्याचे गुणधर्म यामध्ये आढळून येतात. तसेच बेकिंग सोडा सुरक्षित व परिणामकारक उपाय आहे. त्याचा वापर तुम्ही पुढील प्रमाणे करू शकता. कोमट पाण्यात बेकिंग सोडा टाकून चूळ भरा. हा उपाय तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता.

Tooth Pain Home Remedy In Marathi
दात दुःखीवर आलं उपाय
दात दुखीवर आल्याचा घरगुती उपाय खूप परिणामकारक ठरू शकतो.
त्यासाठी तुम्हाला आल्याचा एक तुकडा जो दात दुखत आहे, त्या दाताखाली ठेवून थोड्या वेळेसाठी चावा. व चावल्यानंतर 25 ते 30 मिनिटासाठी त्या दाताखाली तो तुकडा तसाच राहू द्या जेणेकरून त्या आल्याच्या तुकड्यातील रस त्या दातामध्ये उतरेल आणि लवकर फरक जाणवेल. व आल पोटात गेल्यामुळे त्याचे काही दुसरे दुष्परिणाम देखील होणार नाहीत. आलं हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे.
Tooth Pain Home Remedy In Marathi
ग्रीन टी दात दुःखीवर घरगुती उपाय
ग्रीन टी हे दात दुखी साठी व आरोग्यासाठी उपयुक्त आहे. ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात . कग्रीन टी मध्ये दाहक विरोधी विवीध गुणधर्म आढळतात, जे दाढेमध्ये होणारी वेदना कमी करण्यासाठी मदत करतात. अनेक वेळा आपण पाहतो की, दाढ दुखत असेल तर डॉक्टर सांगतात की चहा घेऊ नका. तेव्हा त्यांच्यासाठी ग्रीन टी हा हमखास उपाय आहे , ग्रिन टी घेतल्यानंतर तुम्हाला दात दुःखी मुळे होणारा त्रास शंभर टक्के कमी व्हायस मदत होईल.
टीप : ही एक सामान्य माहिती असून कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योग्य ते पाउल उचला.
दाढ दुखीवर डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यावा. दाढ नेमकी का दुखते यावर योग्य उपचार घेणं आवश्यक आहे.
Author :- Mr. Shankar Kashte

तर मित्रांनो दात दुःखीवर करा हे घरगुती उपाय | Tooth Pain Home Remedy In Marathi या लेखात आम्ही दात दुःखीवर कोण कोणते घरगुती उपाय तुम्ही करू शकता या विषयी सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…
वरील माहिती मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
धन्यवाद….
तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.