Tractor Yojana Maharashtra:- आपल्या राज्यातील शेतकरी हे विकसित व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवी नवीन आणि विविध माध्यमातून योजना राबवित असते. त्यातलीच एक Maha DBT Portal च्या माध्यमातून महाडीबीटी ट्रॅक्टर योजना राबविण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य सरकार ने केलेला आहे. आपण आज “ट्रॅक्टर अनुदान योजना” बद्दल संपूर्ण माहिती जसे की, या योजनेचे फायदे, या योजनेअंतर्गत अनुदान किती मिळणार? यासाठी पात्रता काय हवी? यासाठी ऑनलाईन किव्वा ऑफलाईन अर्ज कसा करावा? तसेच कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज या लेख मध्ये पाहणार आहोत.
महाडीबीटी ट्रॅक्टर योजना
आपल्या राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्य्र रेषेखाली मोडतात त्यामुळे त्यांना शेती करण्यासाठी पारंपारिक पद्घत च वापरावी लागते. आणि पारंपारिक शेती मध्ये कष्ट फार घ्यावे लागतात आणि या पारंपारिक पद्धतीमधून हवा तेवढा मोबदला देखील मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीने शेती करणे फार गरजेचे आहे. मात्र राज्यातील बहुतेक शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या देखील दुर्बल असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही. त्यामुळे शासनाने “ट्रॅक्टर अनुदान योजना 2023” राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Tractor Yojana Maharashtra 2023 चे फायदे
- या योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनुदान देत आहे.
- राज्य शासनाव्दारे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिला जाणार आहे.
- सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान राज्य शासनाव्दारे दिला जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत महिलांना प्रथम प्राधान्य असणार आहे.
- या योजनेचा लाभ देशातील कुठलाही व्यक्ती घेऊ शकतो.
- ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यामुळे शेतकऱ्यांचे कामे ट्रॅक्टर च्या साहाय्याने कमीत कमी वेळात आणि जलद गतीने होतील.
- शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.
महाडीबीटी ट्रॅक्टर योजना अनुदान
- ट्रॅक्टर
- पॉवर टिलर
- ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे
- बैल चलित अवजारे / यंत्र
- मनुष्य चलित यंत्र / अवजारे
- प्रक्रिया संच
- काढणी पश्चात तंत्रज्ञान
- फलोत्पादन यंत्र / अवजारे
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्र / अवजारे
- स्वयंचलित यंत्रे
- मशागत यंत्र
- पूर्व मशागत यंत्र
- आंतर मशागत यंत्र
- पेरणी व लाकडी यंत्रणांसाठी अर्थसहाय्य
- पीक संरक्षण अवजारांसाठी अनुदान
- काढणी व मळणी अवजारे
ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 पात्रता
- एका शेतकऱ्याला फक्त एकदाच ट्रॅक्टर चा लाभ घेता येईल पुन्हा घेण्यासाठी त्याला 10 वर्षे थांबावे लागेल. परंतू त्याला इतर औजारासाठी अर्ज करता येईल.
- एखाद्या व्यक्तीकडे आधीच ट्रॅक्टर आहे तर तो व्यक्ती औजारासाठी पात्र राहील. मात्र त्याला कोणत्याही एकाच औजाराचा लाभ घेता येईल.
- अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची शेती असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
महाडीबीटी ट्रॅक्टर योजना | Tractor Yojana Maharashtra 2023
ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा ८ अ दाखला
- अर्जदार अनुसूचित जाती जमाती चा असल्यास जात प्रमाणपत्र
- अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
- स्वयंघोषणापत्र
- राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक.
- पूर्व संमती पत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जो आवजार खरेदी करायचा आहे त्या अवजाराचे कोटेशन
- केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला अवजार तपासणी अहवाल
ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 अर्ज करण्याची प्रक्रिया
Online अर्ज
तुम्हाला “ट्रॅक्टर अनुदान योजना 2023” साठी online अर्ज करायचा असेल तर Maha DBT Portal च्या https://mahadbtmahait.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे दिलेली आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला वर दिलेल्या Maha DBT Portal च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- नंतर तुमच्यासमोर वेबसाईट चा मुख्यपृष्ठ ओपन होईल त्यात “New Registration” या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यात तुम्हाला विचारली जाणारी माहिती जसे पूर्ण नाव, मोबाइल क्रमांक, ई-मेल, पासवर्ड भरावे लागेल.
- नंतर तुमचे registration पूर्ण होईल.
- Registration पूर्ण झाल्यानंतर “Login” या बटणावर क्लिक करून तुमचा user name आणि password टाकून लॉगिन करा.
- लॉगिन झाल्यानंतर “My Scheme” या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर खाली “Tractor Anudan Yojana 2023” हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नंतर “Apply Now” या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्यात मागितलेली सर्व माहिती भरा आणि “Apply” या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे Upload करा आणि “Submit” या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑफलाईन अर्ज
“ट्रॅक्टर अनुदान योजना 2023” साठी Offline अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जाऊन कृषी अधिकाऱ्याकडून ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. तो अर्ज पूर्ण भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून त्याच अधिकाऱ्याकडे तो अर्ज सादर करावे लागेल. अशा प्रकारे तुमचा “ट्रॅक्टर अनुदान योजना 2023” साठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पुर्ण होईल.
आम्ही या लेख मध्ये “ट्रॅक्टर अनुदान योजना 2023” याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा आणि तुम्ही या योजनेचा लाभ घ्या किव्वा तुमच्या जवळच्या किव्वा नातेवाईकांना याची गरज असेल तर त्यांनाही हा लेख नक्की शेअर करा.
3 thoughts on “महाडीबीटी ट्रॅक्टर योजना | Tractor Yojana Maharashtra 2023”