Tree Information in Marathi Language हा लेख लिहिण्या मागचा हेतू असा आहे कि प्रत्येकाला “झाडे असतील तर आपण असू” हि संकल्पना कळली पाहिजे आणि तसे आचरण झाले पाहिजे.
Tree Information in Marathi Language
सजीवांच्या आयुष्यात झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. झाड हे फक्त प्राण्यांच आश्रयस्थानच नाही, तर या शिवाय माणूस आणि इतर सजीव जगूच शकत नाही. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जो प्राणवायू आपण घेतो तो या झाडाची देन आहे जर माणसाला प्राणवायू मिळाला नाही तर माणूस हा एक क्षणही जगू शकणार नाही. खरंतर झाड हे मानवाच्या आयुष्यात आणि प्रत्येक सजीवाच्या आयुष्यात एक महत्त्वाची भूमिका बजावत असते.
झाड अगदी लहान असल्यापासून तर मोठे होईपर्यंत आणि तो मेल्यानंतरही त्याचे लाकूड सुद्धा माणसाच्या कामी येतात. ज्या झाडामुळे आपलं अस्तित्व टिकून आहे त्या झाडा बद्दल माहिती असणे फार गरजेचे असते.
भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

मित्रांनो आपण भारत देशामध्ये राहतो भारतामध्ये विविध प्रजातीचे झाड आढळतात . तुम्हाला माहिती आहे का? की भारताचा राष्ट्रीय वृक्ष काय आहे ?चला तर मग आज आपण जाणून घेऊयात की भारताचा राष्ट्रीय वृक्ष हे, वटवृक्ष आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये Banyan tree म्हणतो. हे वृक्ष खूप काळ पर्यंत राहतात. इतकचं नाही तर ,वटपौर्णिमेला या वृक्षाची सुहासिनी पूजा करतात, वटवृक्षाच्या आयू प्रमाणेच आपल्या नवऱ्याची ही आयु, वाढावी यासाठी या वृक्षाला पूजतात. त्याला एक आदरणीय वृक्ष म्हणून संबोधले जाते.
झाडांचे भाग
ज्याप्रमाणे मानवाच्या शरीराला आणि प्राण्यांच्या शरीराला विविध अवयव आहे. आणि त्या अवयवाची एक महत्त्वपूर्ण भूमिका देखील आहे. त्याच प्रकारे झाडाला देखील अवयव आहे त्याला आपण झाडांचे भाग म्हणतो. आणि त्यांची देखील एक विशिष्ट प्रकारची भूमिका असते.
मूळ, स्तंभ, ज्यालाच आपण स्टेम म्हणतो, फुल, फळ ,शाखा लोड, अंकुर फुटणे आणि झाडाची साल. सर्व झाडांचे भाग आहेत.
झाडांचे प्रकार झाड मराठी माहिती
झाडाचा आकार ,झाडाची उंची , विविध प्रकारचे असलेले पान यानुसार आणि त्याचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन,झाडांचे वर्गीकरण तीन टप्प्यांमध्ये केले आहेत.
औषधी वनस्पती
हिरवेगार झाड आणि त्याचे असलेले देठ अतिशय मऊ असते, त्यालाच आपण औषधी वनस्पती म्हणतो.
झुडूप
असे झाड जे कठोर असतात आणि त्यांच्या फांद्या या स्टेम जवळ वाढतात.
वृक्ष
असे झाड ज्याच्या फांद्या जमिनीच्या जास्त उंचीवर असतात, आणि ही झाडे खूप जास्त मजबूत देठ असलेली असतात.
झाडाचे फायदे

झाड जिवंत असल्यापासून तर मेल्यानंतरही त्याचे लाकूड कामी येते. अनन्य साधारण महत्त्वाचा असलेला हे झाड त्याचे खूप फायदे आहेत.
१)आपल्या परिसरात आणि आजूबाजूला असलेले झाड हे आपल्याला नेहमी सुरक्षित ठेवतात .आपले वातावरण कितीही खराब झाले असेल ,आणि आजूबाजूला झाडे असतील तर हानिकारक वायू ते शोषून घेतात. आणि ऑक्सिजन हे वायूमध्ये सोडून एक महत्त्वाची भूमिका बजावतात.
२)पूर आल्यानंतर त्याचा प्रकल्प कमी करण्यासाठी आणि चक्रीवादळ यांना थांबवण्यासाठी झाड हे प्रभावी शस्त्र ठरते. पूर आल्यानंतर झाडांद्वारे त्यांचा प्रकोप कमी करता येतो.
३)जमिनीच संरक्षण देखील झाड करतात. झाड आणि झाडांची पाने हे मातीला घट्ट पकडून ठेवतात. जेणेकरून त्यांचे पावसापासून संरक्षण होते इतकच नाही तर झाडांमुळे मातीची धूप होण्यापासून वाचते.
४)वनस्पतीचे विविध प्रजाती आहेत. यामध्ये काही औषधी वनस्पती देखील आहेत, या औषधी वनस्पती मुळे माणूस आजारांपासून वाचतो.
५)जमीन ही सुपीक होते.
६)ऊर्जा मिळवावी लागते त्याचा खर्च झाडांमुळे कमी होऊ शकतो.
झाडे कापल्यामुळे होणारे भयंकर परिणाम
झाडांचा प्रत्येक भाग हे मानवाच्या आयुष्यात महत्त्वाचा आहे पण हा मनुष्य काही कारखाने निर्माण करण्यासाठी जंगलतोड करतो. कुठल्याही छोट्या गोष्टीसाठी झाडांना कापतो. वृक्षतोडीचे सर्वात महत्त्वाचा आणि भयंकर परिणाम म्हणजे जे प्राणी ,पक्षी यांना गमावणे होय.
वृक्षतोड झाल्यामुळे अनेक पक्षी त्यांच्या प्रजात्या नष्ट झाल्या आहेत. कुठेच आपल्याला कावळा सुद्धा दिसत नाही. खरंच खूप दुःखाची गोष्ट आहे. झाडे कापल्यामुळे वातावरण अगदी तापलेलं दिसत आहे.
त्यामुळेच पाणी पडत नाही आणि शेतकऱ्याला याचा भारी नुकसान होत आहे.
वातावरणामध्ये अनेक घातक वायूंचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे अनेक आजारांना माणूस बळी पडतो .श्वास घेण्यामध्ये त्रास ज्यालाच आपण श्वासोच्छवासाच्या समस्या असे म्हणतो. ओझोन थर हे जंगलतोडीमुळे खूप कमी झाले आहेत. आणि याचे भारी नुकसान मानवाला होत आहे. यामुळे सूर्यामध्ये असलेले अतिनील किरण ,मानव, प्राणी आणि इतर जीवांचा बळी घेत आहे.
Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर
