समान नागरी कायदा माहिती मराठी | Uniform Civil Code In Marathi 2023

Uniform Civil Code In Marathi म्हणजे भारतातील नागरिकांना लिंग, धर्म, आणि लैंगिक प्रवृत्ती विचारात न घेता समान रीतीने समान हक्क लागू होतो.

जेणेकरून कायद्यासमोर सर्व सारखे असतील त्याच्यामध्ये लिंग, भाषा, जात, धर्म प्रांत याच्यावरून जातिभेद निर्माण होणार नाही समान नागरी कायद्यामुळे सर्वांना समान हक्क मिळेल, त्याविषयी सविस्तर माहिती पुढे पाहूयात.

Uniform Civil Code In Marathi

समान नागरी कायदा माहिती मराठी | Uniform Civil Code In Marathi 2023

समान नागरी कायदा म्हणजे कॉमन सिव्हिल कोड किंवा यूनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचे सध्याच्या सरकारचे धोरण आहे. कारण भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी काही आश्वासने दिली होती, त्यामध्ये समान नागरी कायदा लागू करू अशी देखील जनतेला भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते.त्यामुळे त्या आश्वासन पुर्तीकडे सरकारचे पाऊल पडताना दिसत आहे.

काय आहे समान नागरी कायदा

यूनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ म्हणजे एक निष्पक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्माशी सबंध नाही. म्हणजेच जर समान नागरी कायदा लागू झाला तर सर्व धर्मांना एकसारखाच कायदा असेल.भारताच्या राज्यघटने नुसार दोन भागात कायद्यांचं वर्गीकरण केलं जातं.

नागरी कायदे आणि गुन्हेगारी कायदे. लग्न, संपत्ती, वारसदार यांसारखे कुटुंब किंवा व्यक्तीशी संबंधित प्रकरणं नागरी कायद्या अंतर्गत येतात.भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 प्रमाणे सर्व नागरिकांना समान नागरी कायदा असावा असे भारतीय राज्यघटनेच्या घटनेत नमूद करताना म्हटले आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालयाने इसवी सन 1985 ते 1995 व २००३ मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नागरी कायदा अमलात आणावा, असे भारत सरकारला वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. भारतातील राष्ट्रीय एकात्मतेसाठी व सामाजिक एकतेसाठी अशा कायद्याची गरज आहे असे सूत्रांनी नमूद केले होते.

अशा सर्व निवाड्यातून सर्वोच्च न्यायालय व राजकीय पक्षांना व इतर सर्व संघटनांना समान नागरी कायद्याची गरज आहे. असे मान्य आहे. परंतु देशातील इतर काही समाज संघटना ना असे वाटते की समान नागरी कायद्यामुळे त्यांच्या धर्माला काही प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे देशातील राजकीय व धर्म पक्षीय परिस्थिती पाहता असा कायदा अमलात आणण्याची गरज सध्या आलेली नाही असे म्हटले आहे.

हा कायदा म्हणजे देशातील सर्व धर्मीयांच्या नागरिकांसाठी एकच कायदा असे होय. जात ,धर्म ,लिंगभेद यांचे शिवाय समान नागरिक कायदा लागू होईल. सध्याच्या स्थितीत हिंदू ,ख्रिश्चन ,पारसी ,मुस्लिम या धर्मांचे त्यांच्या धर्मानुसार विवाह, घटस्फोट ,वारसा हक्क ,मालमत्तेची वाटणी आणि दत्तक विधी याच्यासाठी या धर्मांची त्यांच्या धर्मा नुसार वेगवेगळे कायदे कार्यरत आहेत.

हा कायदा लागू झाल्यामुळे या सगळ्या धर्माची जी काही त्यांच्या धर्मानुसार असणारे कायदे ती रद्द होऊन एकच समान नागरी कायदा लागू होईल. ज्यामध्ये हिंदू पारशी ख्रिश्चन मुस्लिम या सर्व धर्मीयांना जात किंवा धर्म यांच्यातील भेदभाव नष्ट होतील. समान नागरी कायद्याचे एकच उद्दिष्टे आहे की, हा कायदा कुठलीही जात किंवा धर्म यांच्याशी संबंध न ठेवता सर्व धर्मीयांना समान हक्क व समान कायदा लागू होईल. समान नागरी कायदा वैयक्तिक नसून सामाजिक ऐक्याचे आणि एकात्मतेचे स्वरूप म्हणून कार्यरत होईल.

समान नागरी कायद्याचे फायदे.

समान नागरी कायदा माहिती मराठी

(१) समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर जाती भेद निर्माण होणार नाही.समान कायदा लागू झाल्यानंतर सर्व धर्मातील लग्न व घटस्फोट या प्रक्रियेतील बदल होऊन सर्व धर्मीयांसाठी एकच प्रक्रिया लागू होईल.

(२) समान नागरी कायदा लागू झाल्यावर वारसा हक्क व मालमत्तेची वाटणी पुरुष व महिलांमध्ये समान होईल.समान कायदा लागू झाल्यानंतर सर्व जाती धर्मामध्ये एकतेचे वातावरण निर्माण होईल व जातीभेद निर्माण होणार नाही.

(३) सर्वधर्म यांच्यासाठी एकच कायदा असल्यामुळे अर्थव्यवस्थेला एखादा निर्णय घेण्यामध्ये अडचणी निर्माण होणार नाही.

Uniform Civil Code

समान नागरी कायदा कोणत्या कलमांमध्ये समाविष्ट आहे.

भारतीय संविधानात समान नागरी कायदा (युनिफॉर्म सिविल कोड) लागू करणे बाबत कलम 44 मध्ये या कायद्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कलम 44 हे राज्याचे व देशाचे नितीनिर्देशक तत्वांचा एक भाग आहे. नितीनिर्देशक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालय आदेश करू शकत नाही. परंतु न्यायालय हे तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन करू शकते.

समान नागरी कायदा लागू करण्याबाबत चे आव्हाने काय आहेत.

(१) भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्यामुळे समान नागरी कायदा लागू करणे म्हणजे आपल्या मनात जे धर्माबाबत स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेणे असं काहींच्या मनात असल्यामुळे समान नागरी कायदा लागू करण्यात अडचणी येत आहेत.

(२) समान नागरी कायदा लागू केल्यानंतर हिंदू धर्म हा बहुसंख्यांक आहे. त्यामुळे आपण हिंदू धर्माच्या दबावाखाली येऊ कशी देखील काही जणांचे म्हणणे आहे.

(३) भारत देशामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात भौतिक लोक ही पूर्वपूर्वी चालत आलेल्या आपल्या धर्माशी भावनिक जोडत गेली. त्यामुळे त्यांना मुळात हा कायदा मान्य करणे म्हणजे, आपला धर्म धोक्यात आणणे आहे असे त्यांना वाटते.

समान नागरी कायदा म्हणजे यामध्ये फक्त यामध्ये विवाह घटस्फोट वारसा दत्तक या 4 गोष्टी आहेत. याबाबतचे कायदे सर्वांसाठी समान असावेत. जेणेकरून कायद्यासमोर सर्व सारखे असतील. त्याच्यामध्ये लिंग भाषा जात धर्म प्रांत याच्यावरून जातीभेद निर्माण होनार नाही. समान नागरी कायद्यामुळे सर्वांना समान हक्क मिळेल.

तसेच समान नागरी कायद्यामुळे आरक्षणामध्ये काहीही बदल न होता. आरक्षण हे ज्या जातीसाठी दिलेले आहे. त्या जाती धर्मातील लोकांना त्याचा लाभ आहे, त्यांना तसाच लाभ पुढेही घेता येइल. आरक्षणामध्ये काहीही बदल समान नागरी कायद्यामुळे होणार नाही.

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

तर मित्रांनो तुम्हाला समान नागरी कायदा माहिती मराठीही माहिती Uniform Civil Code

माहितीआवडली असेल.तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…

वरील निबंध मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद…

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Leave a Reply

%d bloggers like this: