Vastu Shastra in Marathi | वास्तुशास्त्र सोप्या टीप्स ज्याने घरात येईल सुखशांती
बऱ्याच वेळा आपण असे बघतो की एखाद्या घरात कितीही पूजाअर्चा केली तरी त्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही. योग्य पद्धतीने लोक वास्तुशांती घालतात नातेवाईकांना मित्र परिवारांना बोलवतात निमंत्रण पत्रिका छापतात पण तरीही तेथे समाधानचाच अंश नसतो. असे का होते?

याचे उत्तर जर आपण वास्तुशास्त्रामध्ये शोधले तर तुम्हाला बऱ्याच टिप्स आणि छोटे छोटे उपाय सापडतील ज्यामुळे घर किंवा ऑफिस याच्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास किंवा नष्ट होण्यास मदत होते आणि वातावरण सकारात्मक बनते.
प्रवेशद्वाराला कोणता रंग असावा
- जर तुमचे प्रवेशद्वार पश्चिम दिशेला असेल तर निळा किंवा पांढरा रंग वास्तुशास्त्रामध्ये सजेस्ट केला आहे.
- जर तुमचे प्रवेशद्वार हे उत्तर दिशेला असेल तर हिरवा रंग प्रवेशद्वाराला द्यावा
- जर तुमचे प्रवेशद्वार पूर्व रंगाला असेल तर त्यासाठी पांढरा ब्राऊन किंवा फिकट निळा रंग असावा
- जर प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर चंदेरी नारंगी किंवा गुलाबी रंग द्वाराला द्यावा
Vastu Shastra in Marathi | वास्तुशास्त्र सोप्या टीप्स ज्याने घरात येईल सुखशांती
घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी Vastu Shastra in Marathi टिप्स
जर तुमच्यावरती लक्ष्मीची कृपा नाही असे तुम्हाला वाटत असेल तर घरातील पहिली पोळी किंवा शेवटी उरलेली पोळी गाईला खाऊ घाला असे केल्याने तुमचे भाग्य उजळेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त कामांमध्ये यश मिळेल
घरामध्ये कधीही गळत असलेला पाईप किंवा नळ ठेवू नये कारण हे पैशांची चणचण जाणवण्याचे कारण आहे असे आपल्या वास्तुशास्त्रात म्हटले आहे त्यामुळे असे नळ किंवा पाईप ताबडतोब रिपेअर करून घ्यावे
Vastu Shastra in Marathi | वास्तुशास्त्र सोप्या टीप्स ज्याने घरात येईल सुखशांती
घरामध्ये सुख शांती कायम ठेवण्यासाठी किचन मधील कचराकुंडी नेहमी उत्तर पश्चिम दिशेला असावी
किचन मध्ये तवा किंवा कढई उलटी ठेवू नये कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा संच होण्याची दाट शक्यता असते तसेच दररोज स्वयंपाकानंतर तुमचा तवा धुवून ठेवावा.
घरात ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा कारण की ही दिशा माता लक्ष्मी देवीला फार प्रिय असते शक्य असल्यास देवघर याच कोपऱ्यात असावे
Vastu Shastra in Marathi | वास्तुशास्त्र सोप्या टीप्स ज्याने घरात येईल सुखशांती
सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता फार जास्त असते म्हणून या वेळेस शक्य असल्यास दारे उघडे ठेवावी तसेच सूर्यकिरणांना घरात येण्यासाठी मार्ग मोकळा करावा
घरामध्ये जर पाण्याचा खळखळ करणारा आवाज असेल तर त्यामुळे भरपूर अशा ऊर्जेचा प्रवाह घरात तयार म्हणून अनेकदा घरी एक्वेरियम बसवणे शुभ मानले जाते.
घरामध्ये कधीही बेडरूम मध्ये बूट आणि चपला ठेवण्याची जागा नसावी तसेच झोपण्याच्या खोली बाहेरही बूट ठेवू नये त्यामुळे घरातल्या व्यक्तींचे आरोग्य सतत बिघडते असे वास्तुशास्त्र म्हणत
बेडरूम मध्ये कधीही तोडफोड झालेल्या भिंती किंवा कपाटे किंवा तुटक्या काचा नसाव्यात यामुळे नवरा बायको मध्ये सतत भांडण होतात
स्वयंपाक घरात गॅस हा पूर्व दिशेला ठेवता आला तर पहावा. तसेच तो सिंक पासून लांब असला पाहिजे.
गॅस हा कधीही दरवाजा किंवा खिडकी यांच्या जवळपास ठेवू नये त्यामुळे अग्नीदेवतेची पवित्रता घरात राहत नाही असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे तसेच किचनच्या बाहेर कधीही पाण्याचं पिंप किंवा टीप ठेवू नये
Vastu Shastra in Marathi | वास्तुशास्त्र सोप्या टीप्स ज्याने घरात येईल सुखशांती
प्रश्नोत्तरे Vastushastra in Marathi FaQs
खरंच एखाद्या घरात वास्तुदोष म्हणतात तसं काही असतं का
हे सर्व तुमच्या मानण्या आणि न मानण्यावर अवलंबून आहे परंतु तुम्ही दिलेल्या गोष्टी जर पाळून पाहिल्या तर नक्कीच अनुभव येतो असे भरपूर जणांचे म्हणणे आहे
वास्तुशास्त्रामुळे घरातली भांडण टाळता येतात का
कधी कधी अचानक आपल्याला चिडचिड होते नकारात्मकता जाणवते याचे जर तुम्ही कारण शोधले तर तुम्हाला कधीही सापडणार नाही पण त्याचे उत्तर तुम्हाला वास्तुशास्त्रामध्ये दिसून येते कारण की अनेक गोष्टी या मानवी मनावर ती परिणाम करत असतात त्यामुळे जर तुम्हाला भांडण टाळायचे असेल तर वास्तुशास्त्रामध्ये दिलेले अनेक पर्याय तुम्ही करून पाहिले पाहिजे
स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावे
घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी स्वयंपाक घर हे नेहमी आग्नेय दिशेला असावे जर तसे संभव नसेल तर तुम्ही उत्तर पश्चिम दिशेला देखील ते बनवू शकता
Vastu Shastra in Marathi | वास्तुशास्त्र सोप्या टीप्स ज्याने घरात येईल सुखशांती
वास्तुशास्त्रानुसार बेडरूमला कोणता रंग द्यावा
बेडरूमला कधीही गडद रंग असा देऊ नये हलका गुलाबी निसर किंवा फिकट हिरवा या तीन रंगापैकी एखादा रंग बेडरूमला द्यावा त्यामुळे नात्यांमध्ये नेहमी मधुरता राहते.
तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि यावर अजून माहिती हवी असल्यास कळवा.