Vat Purnima in Marathi 2023 | वटपौर्णिमा माहिती मराठी

Vat Purnima In Marathi 2023 Information | वटपौर्णिमा माहिती मराठी
आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की, हिंदू धर्मात पंचांगानुसार अनेक प्रकारचे सण-उत्सव साजरे केले जातात त्यापैकीच एक ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही “वटपौर्णिमा” म्हणून साजरी केली जाते. यादिवशी हिंदू धर्मातील स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं या हेतूने वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालून वटपौर्णिमेच्या व्रत करतात. सात प्रदक्षिणा घालण्यामागचा हेतू असा आहे की, पुढचे सात ही जन्म मला हाच पती मिळावा.

या वर्षी वटपौर्णिमा शनिवारी 3 जून 2023 रोजी आहे.

Vat Purnima 2023 Information In Marathi | वटपौर्णिमा माहिती मराठी

या दिवशी वड आणि पिंपळ या वृक्षांची पुजा केली जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर वड हा निसर्गतःच दीर्घायुषी असते आणि पिंपळ हा झाड मानवाला जगण्यासाठी गरजेचं असलेलं ऑक्सीजन 24 ही तास देते. अशा झाडांची कत्तल होऊ नये म्हणून देखिल ही कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. कारण एखाद्या वृक्षाला एकदा का पवित्र मानलं आणि त्याची पुजा केली की त्याची सहसा कत्तल केली जात नाही. या वटपौर्णिमा बद्दल एक पारंपारिक कथा प्रसिद्ध आहे ते आपण पाहूया….

वटपौर्णिमा:- पारंपारिक कथा Vat Purnima in Marathi

पुराणांच्या आधारावर अशी एक मान्यता आहे की, एक “भद्र” नावाचा राज्य होता. त्या राज्यात “अश्वपती” नावाचा राजा राज्य करीत होता. त्या राज्याला एक कन्या होती तिचं नाव “सावित्री” होतं. ती अतिशय सुंदर, नम्र आणि फार गुणाची मुलगी होती. सावित्री ही जेव्हा विवाहासाठी पात्र झाली तेव्हा त्या राज्याने आपल्या मुलीला तिला आवडेल असा वर शोधायची तिलाच पूर्ण परवानगी दिली. सावित्री ने आपल्यासाठी एका “सत्यवान” नावाच्या राजकुमाराची निवड केली.

Vat Purnima in Marathi

“सत्यवान” हा “धृमत्सेन” या राज्याचा मुलगा होता. धृमत्सेन हा “शाल्व” राज्याचा राजा होता. मात्र त्याचं राज्य त्याच्या शत्रूंनी आक्रमण करून आपल्या हातात घेतलं होतं. त्यामुळे धृमत्सेन हा आपला मुलगा आणि आपल्या राणी सोबत एका जंगलात राहत होता. भगवान नारद ला सत्यवानाचे आयुष्य हे केवळ एक वर्षाचंच आहे हे माहिती होतं, त्यामुळे त्याने सावित्री ला चेतावणी दिली होती की, सत्यवानाशी विवाह करू नको कारण त्याचं आयुष्य हे केवळ एक वर्षाचं उरलेलं आहे. परंतु सावित्री ने भगवान नारदाचं न ऐकता सत्यवान सोबत विवाह केलं आणि ती जंगलात येऊन आपल्या पती सोबत सासू सासऱ्यांची सेवा करून राहू लागली.

Vat Purnima 2023 Information In Marathi | वटपौर्णिमा माहिती मराठी Vat Purnima in Marathi

एक वर्ष जवळ जवळ संपत आलेला होता आणि नारदाने सांगितल्या प्रमाणे सत्यवान चा मृत्यू आता अवघ्या 3 दिवसावर येऊन ठेपलेला होता म्हणून सावित्री ने सत्यवान साठी 3 दिवसाचा उपवास पकडुन व्रत चालू केलं होतं. सत्यवानाच्या मृत्यू च्या दिवशी तो रोजच्या प्रमाणे जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेला असता सावित्री सुद्धा आज त्याच्या सोबत गेली होती. लाकडे तोडता-तोडता अचानक सत्यवान ला भोवळ आली आणि तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे त्याचे प्राण घेण्यासाठी आला आणि त्याचे प्राण नेऊ लागला. त्यामुळे सावित्री सुद्धा यमाच्या मागे मागे जाऊ लागली.

Vat Purnima in Marathi

यम ने कित्येकदा तिला म्हटलं की माझ्या मागे येऊ नको मात्र सावित्री ऐकायला तयार न्हवती. तिने यमास स्पष्ट शब्दात परत जाण्यास नकार देऊन म्हणाली की, जिथे माझे पती जातील तिथेच मी जाईन. आणि त्यांच्या बरोबर जाण्याचा हट्ट धरला. तिची एवढी दुर्दम्य इच्छाशक्ती बघून यम तिच्यावर खुप प्रसन्न झाला आणि त्याने म्हटलं की, मी तुझी ही दुर्दम्य इच्छाशक्ती बघून अतिशय प्रसन्न झालो. त्यामुळे तू मला कोणतेही तीन वर माग मी ते वर पूर्ण करेन असं वचन देतो.

तेव्हा सावित्रीने यमास तीन वर मागितले. 1) माझ्या सासू-सासऱ्याची दृष्टी परत येऊ दे. 2) माझ्या सासू-सासऱ्याचा गेलेला राज्य परत मिळू दे. आणि 3) मला एक पुत्र प्राप्ती व्हावी. हे तीन वर मागताच यमाने तथास्तु म्हटले आणि मग त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली त्यामुळे सावित्रीच्या पुत्र प्राप्तीच्या वर मुळे यमाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सावित्रीने ज्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण परत मिळविले ते झाड वडाचे होते त्यामुळे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करून व्रत धरले जाते.

Vat Purnima 2023 Information In Marathi | वटपौर्णिमा माहिती मराठी Vat Purnima in Marathi

वटपौर्णिमा :- पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने महत्त्व

वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात कारण, पर्यावरणशास्त्रानुसार वडाच्या झाडाचे विशेष महत्व आहे त्यामुळे त्याच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.

धार्मिक व्रत आणि विधी

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र उपवास करून व्रत करावे असे सांगितलेले आहे. ज्या स्त्रियांना सलग तीन दिवस उपवास करणे शक्य नसल्यास फक्त पौर्णिमेच्या दिवसी उपवास करून व्रत पूर्ण करावे. या व्रताचे मुख्य देवता ब्रह्मदेव आहेत आणि सत्यवान, सावित्री आणि भगवान नारद हे उपांग देवता आहेत. हा व्रत करण्याची विधी आपण पुढील प्रमाणे पाहूया:

Vat Purnima 2023 Information In Marathi | वटपौर्णिमा माहिती मराठी Vat Purnima in Marathi

  1. सर्वप्रथम नदीवर जाऊन नदीकाठची वाळू एका पात्रात भरून आणावी.
  2. त्यानंतर त्या पात्रातील वाळू वर सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती ठेवावी.
  3. नंतर त्या मूर्तींची पूजा करून पाच अर्ध्य द्यावीत.
  4. पूजा झाल्यानंतर सावित्री ची प्रार्थना करावी.
  5. पूजा आणि प्रार्थना झाल्यानंतर सायंकाळी सुवासिनी बरोबर सावित्रीची कथा ऐकावी.

सावित्रीचे आदर्श व्यक्तिमत्व

सावित्रीने धन, दौलत, श्रीमंती न बघता त्याच्या आंतरिक गुणांची पारख करून आई-वडील आणि देवगुरू यांच्या विरोधाला बळी न पडता वरास वरमाला घालून विवाह केला. व आपल्या चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने आपल्या पतीचे प्राण परत मिळविले.

योगी अरविंद घोष यांनी सावित्री वर 3 खंडाचे एक महाकाव्य देखील लिहिलेले आहे.

Vat Purnima in Marathi :- प्रार्थना

वटपौर्णिमेच्या दोन प्रार्थना आहे.

1)
`मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे,

धनधान्यनी माझा प्रपंच विस्तारित आणि संतान, नातुने संपन्न होऊ दे’,

Vat Purnima in Marathi

2)
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:।
वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।

वडाची पूजा कशी करायची ते पहा
अक्षय तृतीय का साजरी करतात माहिती वाचा

Leave a Reply

%d bloggers like this: