वेळेचे महत्व by रवी आटे | Veleche Mahatva Essay in Marathi 2023

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत रवी आटे यांनी Veleche Mahatva Essay in Marathi या कीवर्ड वर आधारित “वेळेचे महत्व” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

साहित्य बंध समूह
साप्ताहिक उपक्रम क्र .2
लेख विषय- वेळेचे महत्व
19-20 ऑक्टोबर 2023

वेळेचे महत्व Veleche Mahatva Essay in Marathi

सर्वप्रथम वेळेचे महत्व हा खूपच महत्त्वाचा विषय आहे असे नमूद करतो . बायबल कुराण धम्मपद तसेच जवळजवळ सर्वच धर्मग्रंथांमध्ये वेळेचे महत्व विशद केल्याचे आढळून येते. भारतीय परंपरेतील तत्त्वज्ञानाच्या सर्व प्रकारात वेळेबाबत अतिशय विस्तृत असे वर्णन आढळून येते. सर्व भाषेतील साहित्यात कविता व चित्रपटातील गाण्यात देखील वेळेबाबत विचार आणि भावना व्यक्त केलेल्या दिसून येतात. भूतकाळ अस्तित्वात नाही व भविष्यकाळ अजून आलेला नाही तर केवळ वर्तमान काळातील क्षणच आपल्या हातात आहे असेच तत्वज्ञान सर्वत्र आढळून येते.

Veleche Mahatva Essay in Marathi 2023


व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय आहे व वेळेचे व्यवस्थापन हाच प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचा विषय समजावयास हवा. सामाजिकीकरणाच्या व प्रगतीच्या प्रक्रियेत वेळेचे व्यवस्थापन व नियंत्रण अगत्याचे ठरते. न्याय उशिरा मिळाल्यास अन्याय झाला अशीच भावना दिसून येते. जगात सर्वत्र भौतिक व अभौतिक बाबींची एक विशिष्ट गती ठरलेली असते त्यानुसारच त्या त्या बाबीला तेवढा तेवढा वेळ लागतो. अंतराला देखील प्रकाश वर्षात मोजतात यातच वेळेचे महत्व सामावलेले आहे. समय समय की बात है… अपना भी टाईम आयेगा… केवळ असे म्हणून चालत नाही. चांगली वेळ येण्यासाठी उद्यमशील व कृतिशील असावयास हवे . योग्य दिशेने वाटचाल करणे आवश्यक असते. वेळ जरी अनंत असली तरी आपल्यासाठी वेळ अतिशय क्षणभंगुर एवढीच असते.

वेळेचे महत्व Veleche Mahatva Essay in Marathi

जो क्षण गेला तो गेलाच. गेलेला क्षण पुन्हा परत येत नाही. त्याचा विचार करीत राहिलो तर पुढील क्षण पण वाया जातात. जीवनात परिवर्तन हवे असेल तर वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या जीवनात गेस्टॉल्ट बदलून टाकावा लागतो. नाहीतर सुंदर जीवन प्रत्यक्षात अवतरत नाही. ते सिद्धांतातच राहून जाते. आभासी.

वेळेचे महत्व Veleche Mahatva Essay in Marathi


कबीरानेही म्हटले आहे… काल करे सो आज कर… त्यातील दिव्य भावार्थ लक्षात घ्यावयास हवा. भूतकाळ आणि भविष्यकाळ हे जरी काल्पनिक असलेत तरी अस्तित्वगत जो वर्तमान क्षण आहे तो तरी आपल्यासाठी प्रत्यक्षात कुठे खरा आहे? जर आपण जागृत जीवन जगलो असतो तर आपण वर्तमानात उतरलो नसतो काय?संपूर्ण जीवन आपण कल्पनेतच घालवतो असे दिसते. कालमानपरत्वे आपल्या जीवनात बदल होतच राहतात. पण क्वचितच एखाद्या व्यक्तीने त्याच्या जीवनात स्वतःहून बदल घडवून आणण्यासाठी योग्य प्रकारे प्रयत्न केलेले असतात. अर्थातच त्या व्यक्तीला वेळेचे महत्त्व समजलेले असते. जीवनात सतत बदल होत राहतात. एकाच नदीत दुसऱ्यांदा उतरू शकत नाही असे म्हणतात. पाणी बदललेले असते व आपणही बदललेलो असतो.

वेळेचे महत्व Veleche Mahatva Essay in Marathi

वेळेनुसार ऋतू बदलतात. वेळेनुसार इतिहास बदलतो. सत्ताधीश बदलतात. विविध घडामोडी होतच राहतात सर्वच क्षेत्रात. आणि म्हणून माणसाने घड्याळाचा शोध लावला. मात्र वेळेला कोणी हाती धरू शकत नाही. एका देशात रात्र आहे तर दुसऱ्या देशात दिवस सुरू झालेला असतो.

वेळेचे महत्व Veleche Mahatva Essay in Marathi


बदल मात्र एका गोष्टीत कधीच होत नाही. ती गोष्ट म्हणजे वर्तमान क्षण. क्षणात उतरल्या शिवाय जीवन जगता येत नाही. जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर वर्तमान क्षणातच उतरावे लागेल. सुबह होती है …शाम होती है ..उम्र युही तमामहोती है… असे निराशेने म्हणण्याची वेळ येऊ देऊ नये. उम्रे दराज मांगकर लाये थे चार दिन… दो आरजू मे कट गये… दो इंतजार मे… असे म्हणण्याची वेळच येऊ नये.

Veleche Mahatva Essay in Marathi

वेळेचे महत्व Veleche Mahatva Essay in Marathi


कोणी झोपेतून जागे करीत असेल तर तिला सहकार्य देऊन स्वतःला सहकार्य करावे . वेळेचे योग्य व्यवस्थापन करावे. सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी वेळेचे व्यवस्थापन अतिशय आवश्यक आहे. शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय सामाजिक आर्थिक वैद्यकीय अभियांत्रिकी अशा स्वरूपांच्या विकासासाठी वेळेचे महत्व फारच मोलाचे आहे. कामांचे नियोजन योग्य प्रकारे करावयास हवे. मात्र त्यापूर्वी प्राधान्यक्रम देखील व्यवस्थित आखावयास हवा.

वेळेचे महत्व Veleche Mahatva Essay in Marathi

सकाळच्या गोष्टी दुपारी व दुपारच्या गोष्टी रात्री करू नयेत. योग्य वेळी योग्य त्या गोष्टीच कराव्यात. म्हणूनच वर प्राधान्यक्रमाचा ओझरता उल्लेख केला. तसेच वेळेनुसार झालेले बदल स्वीकारावयास शिकणे देखील जीवनात अतिशय महत्त्वाचे आहे. वृद्धावस्थेत तरुणावस्थेचे आकर्षण वाटू नये तसेच तरुणा अवस्थेत बालपणच केवळ रम्य होते असे वाटू नये. हाती असलेला क्षण सुंदरतम करण्याकडे व्यक्तीचा कल असावा भगवंताकडे केवळ त्यासाठी दृष्टी मागावी इतर कोणतीही याचना करू नये वेळ तर मागूच नये वेळ प्रत्येकालाच दिलेला आहे .त्यामध्ये जेवढे पंख पसरता येतील तेवढे पसरवावेत. चला तर आजचा दिवस देखील आनंदात घालवूया. अरे बघा बघा क्षण आपल्या हातातून सुटत चाललेत!

रवी आटे .सानपाडा.
9324745970


वेळेचे महत्व Veleche Mahatva Essay in Marathi

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या

mazablog.online

नवीन लेख वाचण्यासाठी भेट द्या

https://marathitime.in/

वेळेचे महत्व Veleche Mahatva Essay in Marathi

Mi Chandravara gelo tar Marathi Nibandh

रवींद्र आटे
रवींद्र आटे

Author Information - श्री.रवींद्र प्रल्हाद आटे, सानपाडा नवी मुंबई येथील रहिवासी असून, तालुका सानपाडा आणि जिल्हा ठाणे आहे. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेतून मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर एम ए राज्यशास्त्र-एम फिल राज्यशास्त्र देखील पूर्ण केले आहे. त्यांना 30 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 35 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 5-10 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील लेख,कविता व चारोळी हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना फक्त काही प्रमाणपत्रे हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर - 9324745970

1 thought on “वेळेचे महत्व by रवी आटे | Veleche Mahatva Essay in Marathi 2023”

Leave a Reply