वेळेचे महत्व 600 शब्दांमध्ये सुंदर मराठी निबंध | Veleche Mahatva Essay in Marathi

क्षणाक्षणाला आपल्या हातातून निसटून जाणारा वेळ जो कधी कुणासाठी थांबत नाही. आज पाहूया वेळेचे महत्व हा सुंदर मराठी निबंध | Veleche Mahatva Essay in Marathi.

Veleche Mahatva Essay in Marathi

वेळेचे महत्व 600 शब्दांमध्ये सुंदर मराठी निबंध | Veleche Mahatva Essay in Marathi

प्रसिद्ध अमेरीकी लेखक आणि प्रकाशक बेंजामिन फ्रँकलिन यांनी 1748 मध्ये एका निबंधामध्ये असं सांगितलं होतं की, जर एखाद्याने अर्धा दिवस काम केलं तर त्याला अर्ध्या दिवसाची कमाई मिळणार नाही. कारण जेवढा वेळ काम करेल तेवढाच पैसा मिळेल. म्हणजेच “Time is Money” वेळ म्हणजेच पैसा आहे.

मात्र आजच्या युगात ही म्हण जरा विरुद्ध च झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण आजच्या जीवनशैली मध्ये माणूस सट्टा खेळून एका मिनिटात लाखो कमवते तर लाखो गमवते देखील आणि दिवसभर आपलं घाम गाळून काम करणाऱ्या शेतातील मजुराची कमाई मात्र जास्त नाही आहे. मात्र परिस्थिती या पेक्षा ही उलट आहे. असं मी म्हणत असलो तरी देखील मला “Time is Money” ही म्हण जरा चुकीची च वाटते कारण वेळ हा पैसा मुळीच नाही. कारण आज माणसांकडे पैसा तर अत्याधिक प्रमाणात आहे मात्र वेक पुरेसा नाही. पैसा गेला तर परत कमवता येते मात्र एकदा वेळ गेली की ती परत कधीच मिळवता येत नाही. त्यामुळे वेळ ही अमूल्य आहेस वेळेची पैसा सोबत तुलना कधीच करता येणार नाही.

तुमच्या माझ्या आणि इथल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुनी तरी असा एक व्यक्ती आढळतो जो त्याच्या आयुष्यात खूप यशस्वी आहे. त्याच्या यशाच्या मागे सर्वात मोठ्ठं रहस्य म्हणजे वेळेचा सदुपयोग आहे. ज्या व्यक्तीला वेळेचा सदुपयोग करता येते तो व्यक्ती आयुष्यात कधी ना कधी यशस्वी नक्कीच होतो. हा! थोडा वेळ लागू शकते मात्र शेवटी त्याला यश नक्कीच मिळेल याची शाश्वती हमखास पणे देता येईल. कारण जगात सर्वच गोष्टी मधून वेळेला अधिक शक्तिशाली मानलं जातं. जर एकदा ही वेळ गेली की परत कधीच येणार नाही. आणि वेळेचे हे चक्र सदा ही चालत राहतं ते कुणासाठीही थांबून राहत नाही. त्यामुळे प्रत्येकाला वेळेसोबत चालावंच लागते. जर एखादा व्यक्ती वेळेप्रमाणे चालत नसेल तर वेळ त्याला एक दिवस त्याची किंमत दाखवून देते. आणि मग तो व्यक्ती अपयशी होत असतो.

एक महान संत आहेत, “स्वामी विवेकानंद” त्यांनी असं म्हटलंय की,

“एका वेळी एकच काम करा, व ते काम करतांना इतर सर्व विसरून आपले पूर्ण चित्त त्यात लाऊन द्या.”

कारण एकावेळी अनेक काम केलं तर त्यातलं एकही काम नीट होत नाही. मराठी मध्ये एक म्हण प्रसिध्द आहे, “एक ना धड भाराभर चिंध्या” त्यामुळे त्यांनी म्हटलंय की एका वेळी एकच काम करा आणि असं करा की तो काम करतांना आपल्याला जगाचा देखील विसर पडला पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ते आधी शांत चित्ताने ठरवून घ्या आणि मग त्या एकाच कामावर लक्ष द्या आणि त्यात एवढे गुंतून जा की, ते काम पूर्ण झाल्याशिवाय थांबू नका. त्यामुळे ते तुमचं काम वेळेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण होईल.

प्लास्टिक प्रदूषण वर मराठी मध्ये निबंध वाचा :- Plastic Pollution In Marathi

बाबांसाठी मुलीने लिहिलेल्या कविता वाचा FATHER’S DAY POEM

वेळेचे महत्व 600 शब्दांमध्ये सुंदर मराठी निबंध | Veleche Mahatva Essay in Marathi

आपल्या मधील कित्येक माणसे असे देखील असतात जे म्हणतात की, आयुष्य खूप मोठ्ठं आहे आत्ताच कसली घाई आहे अमका तमका काम उद्या करून आणि असं म्हणत तो उद्या कधीच येत नाही. मात्र आयुष्य फार लहान आहे आणि एकदा गेलेली वेळ पुन्हा कधीच येत नाही. त्यामुळे एखादे काम हाती घेतले तर त्याला न टाळता आजच करा. वेळेचे महत्त्व सांगत असतांना संत कबीर म्हणतात,

काल करे सो आज कर, आज करे सो अब।
पल में प्रलय होएगी बहुरि करेगा कब।।

आज हाती घेतलेले काम हे उद्यावर टाकू नका, ते आजच करा. कारण काळ वेळ कधीच सांगून येत नसते. क्षणातच काही वेगळं काम आलं किव्वा काही वाईट परिस्थिती आली तर तर काम राहून जातं म्हणून वेळेचे महत्व समजून घ्या आणि वेळेप्रमाणे चालत रहा. कारण वेळ कुणासाठीही थांबत नाही तर ते निरंतर चालत राहते.

सर्व थोर संत महात्मे वेळेचे महत्व जाणून होते त्यामुळेच आपण आज त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करीत असतो. ज्या शाळेत विद्या मिळते ती शाळा देखील वेळेवर चालते. वेळेवर अभ्यास केला तरच चांगले गुण प्राप्त करता येते. वेळेवर काम करण्याची सवय असल्यामुळे आज कित्येक विद्यार्थी त्यांच्या जीवनात यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे आज आपण सर्व एक निश्चय करुया, वेळेचे महत्व जाणून घेऊन यशाचं शिखर गाठूया……

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

12 thoughts on “वेळेचे महत्व 600 शब्दांमध्ये सुंदर मराठी निबंध | Veleche Mahatva Essay in Marathi”

Leave a Reply

%d bloggers like this: