साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ.क्रांती तानाजी पाटील यांनी Veleche Mahatva Marathi Essay या कीवर्ड वर आधारित “वेळेचे महत्त्व” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.
साहित्य बंध समुह साप्ताहिक उपक्रम क्र – २
लेख विषय :- वेळेचे महत्त्व
१९-२० ऑक्टोबर २०२३
वेळेचे महत्त्व by सौ.क्रांती तानाजी पाटील | Veleche Mahatva Marathi Essay 2023
वेळेचे महत्त्व Veleche Mahatva Marathi Essay
वेळ कुणासाठी थांबत नाही.
हे आपण सर्वांनी नेहमी ऐकले आहे.पाहिले आहे. आणि अनुभवले सुध्दा आहे.
यावरुनच आपल्याला वेळेचे महत्त्व काय आहे. हे समजून जाते. म्हणून प्रथम आपण प्रत्येकाने वेळेचे नियोजन करायला शिकले पाहिजे. ज्यांना या वेळेचे नियोजन म्हणजेच वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे जमते. त्यांना जीवनात अवघड व अशक्य असे काहीही नाही.
तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by सौ.क्रांती तानाजी पाटील | Veleche Mahatva Marathi Essay 2023
वेळेचे सुयोग्य व्यवस्थापन करून जर तुम्ही दिनक्रमाला सुरुवात केली. तर मग आयुष्यात यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही. आपल्या जीवनात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
म्हणूनच वेळ ही अमुल्य मानली जाते. “जगात असा कोणी श्रीमंत नाही कि जो वेळ विकत घेऊ शकेल. आणि जगात एवढा गरीब ही कोणी नाही कि ज्याला वेळ बदलता येणार नाही.” खरतरं वेळ ही सर्वांना दररोज सारखीच मिळत असते. तरीसुद्धा कोण खुप यशस्वी होतो. तर कुणी अपयशी ठरतो. कोण खुप श्रीमंत तर कुणी खुप गरीब असतो. कोणी खुप विद्वान तर कोणी मंद, कोणी खुप आनंदी तरी कुणी दु:खी कोणाजवळ वेळ असतो तर कोणाजवळ बिलकुलच वेळ नसतो. याचा अर्थच असा आहे. जो वेळेचा सदुपयोग करुन, वेळेचे योग्य सुव्यवस्थापन करु शकतो. त्याच व्यक्ती आयुष्यात यशस्वी, महान ,आनंदी व निरोगी राहू शकतात.
तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by सौ.क्रांती तानाजी पाटील | Veleche Mahatva Marathi Essay 2023
ती व्यक्ती व्यावसायिक असेल. नोकरदार असेल. खेळाडू स्पर्धक असेल, सुपर स्टार अभिनेते किंवा अभिनेत्री असतील, अधिकारी असेल, रतन,टाटा, अंबानी ,बिल गेट्स सारखे श्रीमंत उद्योजक असतील,प्रसिद्ध लेखक असतील, गायक असतील, किंवा महात्मा गांधी, नेहरू,मा.यशवंतराव चव्हाण. सारखे थोर नेते असतील,अथवाआईनस्टाईनएडिसन सारखे शास्त्रज्ञ असतील. ते त्यांच्या- त्यांच्या क्षेत्रात तेंव्हाच महान बनले. जेंव्हा त्यांनी वेळेचे योग्य व अचूक व्यवस्थापन तर केलेच. पण, त्याच बरोबर त्यांनी वेळेवर नियंत्रण ठेवले. आणि म्हणून त्यांनी मोठे,मोठे इतिहास रचले.
‘वेळेच्या अधीन होण्यापेक्षा वेळेला तुमच्या हातात ठेवा’.

तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by सौ.क्रांती तानाजी पाटील | Veleche Mahatva Marathi Essay 2023
त्याकरिता पहिल्यांदा आपणांस आपल्याला, आपल्या जीवनातील एक ‘ध्येय’ निश्चित केले पाहिजे. आणि त्या ‘ध्येयपूर्तीसाठी’ वेळीच, वेळेचे महत्त्व ओळखुन,वेळेचे नियोजन करायला शिकले पाहिजे. प्रत्येक दिवशीचा आपला सुनिश्चित दिनक्रम ठरलेलाच हवा. त्या दिवसभरात आपल्याला कोणती,कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत. त्यातुनही सर्व प्रथम कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे. ते ठरवून त्यानुसार आपल्या उठण्याची वेळ ठरवली पाहिजे. व त्यादिवशी ची ठरलेली कामे पूर्ण झाल्यानंतरच झोपण्याची वेळ ठरवावी. तरच तुम्ही यशस्वी व्हाल.
तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by सौ.क्रांती तानाजी पाटील | Veleche Mahatva Marathi Essay 2023
वेळेचे महत्त्व हे खरतरं नव्याने सांगायला नको. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला याचे महत्त्व अगदी क्षणाक्षणाला जाणवते. तरीही आपल्या ‘बेजबाबदार व आळशी वृत्तीमुळे’ आपण मिळालेला वेळ आपण वाया घालवतो. आणि त्यामुळेच मग पश्च्यातापाची वेळ येते.
खरतरं दोष असतो आपला स्वतःचा. पण आपण वेळेलाच बोलतो. वेळच चांगली नाही. कसल्या वेळेवर जन्म झाला कोणास ठाऊक. अशाप्रकारची विधाने बोलली जातात. पण वेळ सर्वांसाठी सारखीच असते. जेंव्हा वेळेच्या बाबतीत आपले नियोजन नसते. वेळ आपण वेस्ट घालवतो. तिथे बेस्ट काही मिळत नाही. म्हणूनच वेळेवर जागे व्हा. वेळेचे अचूक नियोजन करा. व वेळेवर स्वार व्हा. म्हणजे यशस्वी जीवनाची ही घौडदौड कधीच थांबणार नाही.
तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by सौ.क्रांती तानाजी पाटील | Veleche Mahatva Marathi Essay 2023
आयुष्य किती आहे. हे माहिती नाही. पण आयुष्यात दररोज चोवीस तास न चुकता आपल्याला भेटतात. त्या चोवीस तासांतले क्षणनक्षण आपल्यासाठी ‘अमुल्य’ असले पाहिजेत. प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असते. वेळेचे महत्त्व जाणून
आपण प्रत्येकाने आप- आपल्या वेळेनुसार वेळेचे नियोजन करुन. वेळेला महत्त्व दिले पाहिजे. वेळेला म्हणूनच ‘Time is Mony ‘ असे बोलले जाते.

तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by सौ.क्रांती तानाजी पाटील | Veleche Mahatva Marathi Essay 2023
वेळेलाच गुरु मानले जाते. कारण वेळ जे शिकवते. ते दुसरं कुणीही शिकवू शकत नाही. ज्या,ज्या व्यक्तींनी स्वतः नावावर ‘ World records’ केली आहेत. त्या,त्या व्यक्तींचा इतिहास जर आपण वाचला. तर लक्षात येईल. त्यांनी क्षणा,क्षणाचे महत्त्व जाणले होते. म्हणूनच अचूक नियोजन करुन ते “विजयवीर” ठरले.गौतम बुद्धांना जेंव्हा विचारले की, सगळ्यात मोठी चूक आपण काय करतो?? तेंव्हा बुध्दांनी सांगितले कि, आपणांस मिळालेला अमुल्य वेळ आपण वाया घालवतो. ती जीवनातील आपली सर्वात मोठी चुक असते. गौतम बुद्धांच्या या विधाना वरुनच आपल्याला वेळेचे महत्त्व लक्षात येते.
वेळेच्या आधी व वेळेनंतर झालेल्या गोष्टींना महत्त्व नाही. कारण त्या गोष्टींची किंमत शुन्य असते. उलट अचुक वेळेत झालेल्या गोष्टीं अमुल्य असतात. आयुष्यात म्हणुनच वेळेला महत्त्व द्या. वेळेचे नियोजन करा. व नियमित वेळेवर सगळ्या गोष्टी करा. वेळ पाळा. गेलेला पैसा पुन्हा मिळू शकेल. पण वेळ परत कधीच मिळू शकत नाही. हे सदैव लक्षात ठेवा…!!
वक़्त हे लड़कर जो अपना नसीब़ बद़ल दे |
इंसान वह़ीं है, जो अप़नी तक़दीर बद़ल दे |
कल क्या होगा, कभ़ी न सोचों
क्या पता कल वक़्त खुद अपनीं तस्वीर बदल दे ||
©® सौ.क्रांती तानाजी पाटील.
मु.पो.दुशेरे.
ता.कराड. जि.सातारा.
🙏🙏🙏🙏
तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by सौ.क्रांती तानाजी पाटील | Veleche Mahatva Marathi Essay 2023
समाप्त.
साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात
दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.
मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.
लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.
या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल
१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा
२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे
३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.
४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.
५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.
६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.
तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत
https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd
9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.
आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online
तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by सौ.क्रांती तानाजी पाटील | Veleche Mahatva Marathi Essay 2023
वेळेचे महत्व 600 शब्दांमद्धे निबंध वाचा