साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत केशवराव चेरकु यांनी Veleche Mahtva Marathi या कीवर्ड वर आधारित “वेळेचे महत्त्व” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.
साहित्य बंध समुह साप्ताहिक उपक्रम क्र – २
लेख विषय :- वेळेचे महत्त्व
१९-२० ऑक्टोबर २०२३
वेळेचे महत्त्व by केशवराव चेरकु | Veleche Mahtva Marathi 2023
” वेळेचे महत्त्व ” Veleche Mahtva Marathi
सुर्यास्ताच्या सांज वेळी
सावली ही साथ सोडते।
आपले सर्व दुर जातात
वेळच जेव्हा मुख मोडते।।….केशवराव…
वेळच जेव्हा मुख मोडते म्हणजेच योग्य वेळ निघून गेलेली असते तेव्हा सर्व जगच आपल्या पासुन दुर जाते मग ते आप्तेष्ट असो मित्र असोत. म्हणून वेळ ही पाळल्याच गेली पाहिजे. वेळच कालचक्र हे पुढे पुढे चालत राहते पण आपल्याच गतीने. ते कोणासाठी ही थांबत नाही कुठल्याही परिस्थितीत. कोणासाठी ही वेळ आपली गती बदलत नाही म्हणून वेळ ही महत्त्वाची
वेळेचे महत्त्व विचारायचं असेल तर जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तींना विचारा. वेळेवर जेवणे, वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, वेळेवर अभ्यास, वेळेनुसार सर्व काम करणे. वेळेचा सदुपयोग करणे. ही सवय त्यांना असल्यामुळे ते यशस्वी होऊ शकले हाच मंत्र ते तुम्हाला देतील. वेळ पाळल्यामुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य स्वास्थ, सुंदर, आनंदमयी आयुष्यात बनवते. वेळ ही खूप मौल्यवान आहे म्हणून आपण ती योग्य ठिकाणी योग्य तितका त्याचा सदुपयोग केला पाहिजे.
तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by केशवराव चेरकु | Veleche Mahtva Marathi 2023
वेळ ही अशी गोष्ट आहे ती कधीच थांबत नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे जे काम जेव्हा करायचे असते तेव्हाच केले पाहिजे नाहीतर ती वेळ कधीच परत येत नाही. लहानपणी करायचं काम लहानपणी केलं तर ते बरोबर. पण तेच काम थोडे मोठे झाल्यावर म्हणजे तरुणपणी करने म्हणजे वेळ गेल्यावर तर लोक हसतील, तारुण्यात करायचं काम जर म्हातारपणी केलंत ते ही हंस झाल्यासारखे होईल.
तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by केशवराव चेरकु | Veleche Mahtva Marathi 2023

तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by केशवराव चेरकु | Veleche Mahtva Marathi 2023
वेळेचे परिमाण सेकंद, मिनिट, तास, दिवस, महिना, वर्ष, असा वाढता क्रम आहे. छोट्या पासुन मोठ्या पर्यंत परिमाण त्यांचे परिणाम मात्र सारखेच असतात. कधी भरुन न निघणारे आणि महत्व तेवढंच मोठे. सर्वात छोट परिमाण म्हणजे सेकंद. सेकंद उच्चारण्याच्या अगोदर सेकंद संपलेला असतो. पण त्याचे परिणाम विचारायचे असेल तर ऑलिंपिक मधील स्पर्धकांना विचारा ज्याचं विजयश्री काही दशांश सेकंदाने हुकलेले असते. ज्या स्पर्धेची तयारी तो गेल्या चार वर्षांपासून करत असतो. तेव्हा कळतं एका सेकंदाच वेळेच महत्व किती ? असे सर्वच वेळेच्या परिमाणाचे आहे.
तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by केशवराव चेरकु | Veleche Mahtva Marathi 2023
काही मिनिटे उशीर झाला आणि त्यामुळे बस, ट्रेन सुटली तर सर्वच पुढील आयोजित महत्त्वाचे कार्यक्रम रद्द करावे लागतात किंवा त्या महत्वाच्या कार्यक्रमाला हजर राहता येत नाही. तेव्हा कळत मिनिटाच महत्त्व. वेळेप्रमाणे अभ्यास न केल्यामुळे नापास झालात तर वर्षं वाया जात तेव्हा आपल्या वेळेच महत्व कळत. अशा बऱ्याच संधी आपण आयुष्यात आपण गमावतो ते फक्त वेळीच वेळेच महत्व न कळल्यामुळे वेळ न पाळल्यामुळे तसेच वेळेचा सदुपयोग आपण न केल्यामुळे हे सर्व घडत. त्याच वेळेला निर्णय न घेतल्याने आपलं किंवा दुसऱ्याच आयुष्यच बदलून जातं.
जन्म आणि मृत्यू या दोन्ही वेळा निश्चित असतात त्या विधात्याने ठरवलेल्या असतात. त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात, त्यावर आपला संयम नसतो. जीवन आणि मृत्यू या मधला जो काळ असतो ज्याला ” आयुष्य ” असे म्हणतात. हा एक मोठा काळ असतो. त्या वेळेवर आपल्या मनावर ताबा ठेऊन योग्य वेळी वेळेच महत्व समजुन निर्णय घेणं आपल्या हातात असतं. मृत्युच्या अगोदरचा सर्व काळ (वेळ)आपला असतो. त्याच कधी आणि कसा सदुपयोग करायचा हे आपल्या हातात असतं.
आपल्याला या गोष्टी आपले आईवडील, आपले गुरुजन हे त्यांच्या परीने सांगत असतात.
तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by केशवराव चेरकु | Veleche Mahtva Marathi 2023
आपल्याला कळत पण वळत नाही या युक्ती प्रमाणे या सर्व गोष्टी कळतात पण नेमकं हे वेळेच गणित कसं साध्य करता येईल हे कळत नसत. कारण तर वेळेच व्यवस्थापन कसे करायचे हे आपल्याला माहीत नसते. म्हणून आपण जो पर्यंत आपण वेळेच व्यवस्थापन शिकत नाही आणि आत्मसात करत नाही. तो पर्यंत आपण आयुष्यात यशस्वी होऊच शकत नाही. कुठलच कार्य वेळेच्या व्यवस्थापणा शिवाय होऊ शकत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंतच्या वेळेच आपण वेळापत्रक बनवून आपल्या कामाच्या महत्त्वानुसार वेळेची विभागणी करु ठेवले तरच आपण घरातील किंवा बाहेरील म्हणजे ऑफिसची जबाबदारी, मोठं मोठे प्रोजेक्ट्स वेळेवर पुर्ण करु शकतो. चांगले वेळेचे व्यवस्थापन कौशल्ये तुमची उत्पादकता वाढवतात आणि तुम्हाला अधिक काम करण्यात मदत करतात .
तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by केशवराव चेरकु | Veleche Mahtva Marathi 2023

तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by केशवराव चेरकु | Veleche Mahtva Marathi 2023
वेळ व्यवस्थापन कौशल्ये तुम्हाला तणाव कमी करण्यात आणि तुमच्या वेळेला प्राधान्य देण्यात मदत करतात. प्रभावी वेळ व्यवस्थापन तुमची उद्दिष्टे स्पष्ट करते आणि तुमच्या सर्वात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देते. परिणामी, मोठे आणि चांगले परिणाम साध्य करण्यासाठी आपल्याकडे अधिक वेळ आहे. म्हणून वेळेच महत्व, वेळेच व्यवस्थापन, आणि शिस्तबद्धता. या गोष्टी आयुष्यात कळल्या तरच आपण यशस्वी होऊ शकतो. संत कबीर यांनी वेळेच्या महत्त्व समजावण्याचा प्रयत्न त्यांच्या पुढील ओळीतून केला आहे.
काल करे सो आज कर,
आज करे सो अब
पल में प्रलय हो जाये
तो बहुरि करेगा कब।।
अर्थात उद्या करायच काम आजच केलं पाहिजे. आज करायचं काम आता या घडीला कर, क्षणात प्रलय झाला तर बहुरि केव्हा करणार. ज्या वेळेच काम त्याच वेळेच्या आतच केलं पाहिजे. करु बघु होईन जाईल ही मानसिकता नको.
आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर वेळेच महत्व आपल्याला कळायला हवे. वेळ अशी मौल्यवान गोष्ट आहे ती विकत घेता येत नाही. वेळेला थांबवता येत नाही. वेळेनुसार सर्व जग चालत असत तसंच आपण चाललं पाहिजे. कारण
जो थांबला तो संपला.
केशवराव चेरकु
कोपरखैरणे, नवीमुंबई
तुम्ही वाचत आहात वेळेचे महत्त्व by केशवराव चेरकु | Veleche Mahtva Marathi 2023
समाप्त.
साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात
दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.
मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.
लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.
या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल
१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा
२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे
३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.
४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.
५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.
६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.
तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत
https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd
9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.
आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online
वेळेचे महत्त्व by केशवराव चेरकु | Veleche Mahtva Marathi 2023
वेळेचे महत्त्व by Ravi Ate