विजयदुर्ग किल्ला माहिती | Vijaydurg Fort Information in Marathi 2023

महाराष्ट्राचा अभिमान म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग हे पर्यटकांचे आवडीचे स्थळ. Vijaydurg Fort Information in Marathi मध्ये जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

Vijaydurg Fort Information in Marathi

आपलं महाराष्ट्र हे नुसतं महाराष्ट्र म्हणून प्रसिद्ध नाही तर जेव्हा केव्हा ही महाराष्ट्राची गोष्ट येते तेव्हा सर्वप्रथम आठवतात ते म्हणजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले त्यापैकी हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारा विजयदुर्ग ज्याला जिंकून शिवबाने त्याची पुनर्बांधणी केली.

विजयदुर्ग किल्ला इतिहास मराठी (Vijaydurg Fort History in Marathi)

विजयदुर्ग किल्ला माहिती | Vijaydurg Fort Information in Marathi 2023

विजयदुर्ग हा किल्ला राजा भोज या राजाच्या राजवटीत बांधला गेलेला किल्ला आहे. राजा भोज हा शिलाहार घराण्यातील राजा होता. सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सर्वात प्राचीन किल्ला म्हणून ओळखला जातो. राजा भोज यांच्यानंतर छत्रपती शिवाज महाराजांच्या राजवटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी याला सुधारून मजबूत केले.
1205 मध्ये या किल्ल्याचं संपूर्ण काम झाले मात्र 1193 मध्ये किल्ला बांधण्याची सुरुवात झाली होती.
पूर्व जिब्राल्टर” या नावाने हा किल्ला ओळखला जातो, कारण हा किल्ला अभ्यद्द होता.

विजयदुर्ग किल्ला कशासाठी प्रसिद्ध आहे ? (What is Vijaydurg Fort famous for?)

अभिमानाची गोष्ट म्हणजे ,शिवाजी महाराजांनी स्वतः या विजयदुर्ग किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवला होता, आणि यानंतर त्यांनी दुसरा किल्ला म्हणजेच तोरणा किल्ला यावर ध्वज फडकवला होता.

विजयदुर्ग किल्ल्याचे जुने नाव (Old name of Vijaydurg fort)

या किल्ल्याच्या नावाचा इतिहास देखील अगदी गमतीदार आहे. शिवाजी महाराजांनी इसवी सन 1653 मध्ये विजापूर चा बादशहा आदिलशहाकडून हा किल्ला ताब्यात घेतला होता. ते त्या युद्धामध्ये विजयी झाले होते त्यामुळे या किल्ल्याला विजयदुर्ग असे म्हणतात.


Panhala Fort Information in Marathi

Fort of Maharashtra – Manjarsumbha Fort


विजयदुर्ग किल्ला कुठे आहे ? (Where is Vijaydurg fort?)

विजयदुर्ग किल्ला

द्वीपकल्पीय प्रदेशाच्या टोकावर असलेला हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे.

किल्ला अरुंद रस्त्याने जमिनीशी जोडलेला आहे मात्र चारही बाजूंनी पाणी आहे.

किल्ल्याच्या लगतच असलेले बंदर हे नैसर्गिक बंदर आहे तिथे असलेले स्थानिक लोक मच्छीमार याचा खूप मोठ्या प्रमाणात व्यापार करत असतात.

विजयदुर्ग किल्ला हा इंग्रजांच्या ताब्यात कधी गेला?

इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला 1818 मध्ये गेला.

विजयदुर्ग किल्ल्याचे आर्किटेक्चरल वैशिष्ट्ये (Vijaydurg Fort Architecture)

समुद्राखाली असलेला बोगदा हे 200 मीटर पर्यंत आहे. बोगदा काही कारणाने ब्लॉक झालेला आणि अर्धवट आढळतो.

हा बोगदा जर साफ केला तर इतिहासिक आणि आर्किटेक्चरच्या आवडीचे एक उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून इथे काम करू शकतो. मात्र या बोगद्याच्या उपस्थितीत ते शक्य नाही.

समुद्राच्या खाली असलेला आठ दहा मीटर खोलीच्या खोलीत बांधल्या गेलेल, हे समुद्राखालील भिंतीच अस्तित्व निर्माण करतात. आणि या गोष्टीच समर्थन करतात हे महासागरचे शास्त्रीय पुरावे आहेत.
इथे एका भिंतीचे व्यवस्था केली आहे. त्या भिंतीत लेटराईट पासून बनलेली आहे, असं म्हणतात की 122 मीटर लांब तीन मीटर उंच आणि सात मीटर रुंद ही भिंत आहे, जेव्हा आक्रमक या किल्ल्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा स्वतःहूनच समुद्राच्या पाण्यामध्ये बुडून जातात.

विजयदुर्ग या किल्ल्यावर हल्ला करणारे प्रत्येकच जहाज हे समुद्रात बुडाले. त्यामुळे जेव्हा जंजिराचे सिद्धी या किल्ल्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत होते ,तेव्हा त्यांना पोर्तुगीजांनी सांगितले की आमचे दोन जहाज इथे बुडाले आहेत त्यामुळे त्यांनी परतीचा मार्ग निवडला.

नागरी सुविधा

विजयदुर्ग मराठी माहिती

किल्ल्याला जलदुर्ग असे देखील म्हणतात सुमारे 225 किलोमीटर व गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटर आहे याच्या तीन बाजू पाण्याने वेढलेल्या आहेत .या किल्ल्यावर भुयारी मार्ग आहेत.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

१३ डिसेंबर, इ.स. १९१६ या दिवशी या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषणा करण्यात आले होते

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

2 thoughts on “विजयदुर्ग किल्ला माहिती | Vijaydurg Fort Information in Marathi 2023”

Leave a Reply

%d bloggers like this: