स्व. श्री. विनायक मेटे संपूर्ण माहिती मराठी | Best Vinayak Mete Biography In Marathi 2023

मराठा आरक्षणासाठी जीवन अर्पण करणारे दमदार नेतृत्व, शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख स्व.श्री.विनायक मेटे यांची Vinayak Mete Biography In Marathi हि माहिती पाहूया.

मराठा आरक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक स्व. श्री. विनायक मेटे यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला Vinayak Mete Biography In Marathi या Article मध्ये संपूर्ण माहिती देणारं आहोत. त्यामुळे प्रस्तुत Article तुम्ही अगदी शेवट पर्यंत नक्कीच वाचा आणि जाणून घ्या Who is the Vinayak Mete?

Vinayak Mete Biography In Marathi

स्व. श्री. विनायक मेटे यांचे संपूर्ण नाव विनायक तुकाराम मेटे असे आहे. यांचा जन्म 30 जून 1970 रोजी बीड मधील केज तालुक्यातील राजेगाव येथील त्यांच्या मूळच्या राहत्या घरी झाला. त्यांनी त्यांचे सुरवातीचे शिक्षण सातारा येथे घेतले आणि नंतर यशवंतराव मुक्त विद्यापीठ मधून कला या शाखेत पदवी घेतली. त्यांना बालपणापासूनच ज्ञानाची तहान होती तसेच त्यांना समाज कार्याची तळमळ होती त्यामुळे त्यांनी समाज कार्यात पदव्युत्तर पदवी मिळवून आपले शिक्षण केले.

Pollitical Career’s Of Vinayak Mete । स्व. श्री. विनायक मेटे यांचे राजकीय करियर

स्व. श्री. विनायक मेटे यांनी 1980 च्या अखेरीस त्यावेळची उजव्या बाजूची विचारधारा असणाऱ्या शिवसेना या पक्षात प्रवेश घेऊन त्यांनी आपल्या राजकीय करियर ची सुरवात केली. तिथे त्यांनी आपल्या समर्पणाने आणि आपल्या कुशाग्र बुद्धीने त्या पक्षात सुद्धा चांगले पद मिळविले. नंतर ते “अखिल भारतीय मराठा महासंघ” या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक चळळीमध्ये उतरले.

1995 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा महासंघाने तत्कालीन भाजप आणि शिवसेना या युतीला पाठिंबा देत निवडणूक लढवली आणि त्यावेळी ते प्रथमतः आमदार बनले आणि विधानसभेचे सदस्य झाले. नंतर भाजप आणि शिवसेना युती सोबत काही वादविवाद झाल्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष “महाराष्ट्र लोकविकास पार्टी” हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विलीन केला. आणि राष्ट्रवादी पक्षाकडून सलग दोनदा विधान परिषदेत सदस्य राहिले.

विनायक मेटे यांनी “शिवसंग्राम” हा पक्ष स्थापन करण्यासाठी खूप योगदान दिले आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण या मुद्द्यावर तत्कालीन भाजप आणि शिवसेना यांच्या युती मध्ये त्यांच्या “शिवसंग्राम” या पक्षाला सामील केला. विनायक मेटे हे राजकीय दृष्ट्या त्यावेळी महत्वाचा समाज असलेल्या मराठा समाजासाठी भाजप मधील महत्वाचा चेहरा ठरला त्यामुळे मराठा समाजाला भाजप जवळ आणण्यासाठी खूप मोठी मदत झाली.

2014 च्या राज्य निवडणुकीमध्ये विनायक मेटे हे भाजप कडून बीड मतदारसंघामधून उभे राहिले मात्र त्यावेळी तिथे त्यांचा पराभव झाला. परंतु नंतर 2016 मध्ये भाजप कडून ते पुन्हा उभे राहिले आणि यावेळी त्यांचा विजय झाला.

स्व. श्री. विनायक मेटे यांचे समाजासाठी कार्य

मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी झालेल्या आंदोलनात त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे याशिवाय मुस्लीम समाजाला देखील आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आग्रह केला होता. विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी देखील परीक्षा देण्याच्या वयात वाढ करावे ही मागणी करण्यासाठी देखील त्यांचे सर्वात जास्त योगदान आहे.

स्व. श्री. विनायक मेटे संपूर्ण माहिती मराठी | Best Vinayak Mete Biography In Marathi 2023

स्व. श्री. विनायक मेटे हे “मराठा लोकविकस मंच” या संघटनेत सुद्धा सक्रिय होते आणि या मंचा तर्फे राज्यात नाव कमावणाऱ्या मराठवाड्यातील नामांकित व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. आत्ता पर्यंत या मंचतर्फे माझी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे तसेच गोविंदभाई श्रॉफ यांसारख्या अनेक व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे.

सन 2008 मध्ये त्यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची योजना आखलेली होती परंतु लोकसत्ता या वर्तमानपत्राचे तत्कालीन संपादक कुमार केतकर यांनी त्यांच्या योजनेवर टीका केली होती. त्यानंतर विनायक मेटे आणि त्यांची संघटना यांनी ठाण्यातील केतकर यांच्या घरावर हल्ला केला होता.

स्व. श्री. विनायक मेटे यांचे निधन

विनायक मेटे यांचा 14 ऑगस्ट 2022 रोजी मुंबई ते पुणे या एक्स्प्रेस च्या माडप बोगद्याजवळ त्यांच्या कार ने अपघात झाला आणि त्यांना फार दुखापत झालेली होती त्यामुळे त्यांना कामोठे येथील एमजीएम कामोठे या रुग्णालयात दाखल केला आणि तिथेच त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यावेळी ते 52 वर्षाचे होते.

Vinayak Mete Biography In Marathi 2023

स्व. श्री. विनायक मेटे यांच्या मृत्यू वरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या मृत्यूवर शोक व्यक्ती करीत म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मी आजच मुंबई मध्ये बैठक बोलवली होती आणि या बैठकीत विनायक मेटे हे उपस्थित राहणार होते परंतु या बैठकी पूर्वीच काळाने त्यांना हिरावून घेतले. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षण चळवळीचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तळमळीने बोलायचे. या स्मारकाच्या कामासाठी राजकीय इच्छाशक्ती निर्माण करून निधीची तरतूद करून घेण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात जीव गमवावा लागलेल्या तरुणांच्या कुटूंबियांना शासकीय नोकरी मिळावी, त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं तसेच आंदोलन करताना दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, गरीब लोकांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम लढत राहिले. मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाचा एक बुलंद आवाज आज हरपला आहे. या धक्क्यातून सावरण्याचे बळ मेटे कुटुंबियांना मिळो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना. माजी आमदार विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रिया

विनायकरावांना गेली अनेक वर्ष जवळून पाहण्याचा योग आला , त्यांचा संघर्ष त्यांच्या समाजासाठी तर असायचाच पण त्याच सोबत तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांची भूमिका असायची , भाजपसोबत असताना त्यांची गोपीनाथरावांसोबत सतत भेट व्हायची , आपला संघर्ष हा मराठा समाजाला एक दिवस न्याय मिळवून देईल याबाबत त्यांना खात्री होती , महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून नेहमी त्यांच्याशी संवाद होत असे , त्यांची तळमळ आणि शोषितांना न्याय देण्याचा आग्रह , धडपड पाहताना नेहमी त्यांचे कौतुक वाटायचे . अधिवेशन काळात विधिमंडळाच्या आवारात होणाऱ्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये त्यांचा आग्रह कायम विधानपरिषदेत मराठा आरक्षणाबाबत विशेष चर्चा घेण्याचा असे , त्यांच्या अशा अकाली निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे . अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

युवराज संभाजी राजे यांच्या प्रतिक्रिया

“माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनावर आपली भावना व्यक्त केली आहे. ते म्हणालेत. ‘एक मोठा शॉक आहे. मराठा समाजासाठी परखडपणे आपली बाजू ते मांडत आले. मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी विधानभवनात आपली बाजू मांडली. मराठा समाजावरील अन्याय सरकारनं दूर करावा, याने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळेल. आजची बातमी ऐकूण मोठा शॉक बसला. वेळोवेळी त्यांनी मला अनेकदा फोन केले होते. कशा पद्धतीनं आपण एकत्र येऊ शकतो, यावर देखील अनेकदा संवाद साधला. छत्रपती घराण्याविषयी त्यांना नेहमी आदर होता, अशी भावना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनावर आपली भावना व्यक्त केली आहे.”

Author:- आशु छाया प्रमोद (रावण)

कवी आशिष

समाप्त


Baba Amte Information in Marathi

Balgangadhar Tilak Information In Marathi

मराठी भाषेच्या वाचकांसाठी आम्ही नवनवीन साहित्य जसे कि लेख, कविता, कादंबरी, निबंध आणि व्यक्तीचरीत्रे इत्यादी घेऊन येत असतो. जर तुम्हाला आमचे हे काम आवडत असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय द्या. जर तुम्हाला वरील लेखात काही तृटी आढळ्यास त्या देखील तुम्ही शेअर करू शकता.

Leave a Reply

%d bloggers like this: