झाडे निबंध 10 ओळी
झाडा-झुडपांना आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे.
त्यांच्याकडून आपणास ऑक्सिजन मिळतो.
झाडे मानवी आयुष्यासाठी खूप उपयोगी आहेत.
त्यांच्यापासून अनेक औषधी बनविता येतात.
आपल्या घरातील लाकडी वस्तू त्यांच्यापासूनच बनवितात.
झाडाच्या वाळलेल्या फांद्या इंधन म्हणून वापरता येतात.
झाड आणि वनस्पतींपासून आपणास फळे आणि भाज्या मिळतात.
त्यांच्यापासून आपणास सुंगधी फुले मिळतात.
झाडे आपणास सावली देतात.
झाडे-झुडपे आपल्यासारखीच श्वास घेतात.