Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 107

Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 180

Zade Lava Zade Jagva Marathi Nibandh | झाडे लावा झाडे जगवा निबंध 500 शब्द

एप्रिल-मे महिन्यात तर खरा उन्हाळा चालू होतो. तेव्हा कुठे “Zade Lava Zade Jagva” ( झाडे लावा झाडे जगवा ) या म्हणीचा महत्व कळते. हल्ली जानेवारी संपली रे संपली लोकांच्या घरी पंखे, कुलर तर AC चालू होतात. परंतु आपण कधी विचार केलाय का की, आधीचे लोकं ज्या वेळी त्यांच्याकडे यातलं कुठलही साधन न्हवतं त्यावेळी ते कसे करत असतील? एवढ्या कडाकाच्या गर्मी मध्ये ते कसे जगत असतील? तर याचं सोप्पं आणि सहज उत्तर आहे ते म्हणजे की, त्यावेळी त्या लोकांना कधीच पंखा, कुलर किव्वा AC ची गरजच भासत न्हवती. कारण त्यावेळी ऋतु हे नियमित आणि नियंत्रित होते.

Zade Lava Zade Jagva Essay in Marathi Nibandh | झाडे लावा झाडे जगवा निबंध

Zade Lava Zade Jagva Essay in Marathi Nibandh | झाडे लावा झाडे जगवा निबंध

मात्र आज उन्हाळ्यात देखील मुसळधार पाऊस पडते आणि कित्येकदा तर पावसाळा या ऋतू मध्ये कडाक्याची उन्ह पडत असते. आणि याचं एकमेव कारण म्हणजे वृक्षांची दिवसेंदिवस वाढती वृक्षतोड आहे. आणि याच वृक्ष तोडीमुळे ऋतूंचं कालचक्र दिवसेंदिवस बिघडत जात आहे आणि यामुळे कित्येक लोकांना आपला प्राण देखील गमवावा लागत आहे.

म्हणून कवी “आशु छाया प्रमोद (रावण)” असे म्हणतात की,
तुझ्याच छायेत वाढलो मी
अन् तुझ्याच छायेत खेळलो मी…
तुझीच कत्तल करून रे वृक्षा
स्वतःचेच सरण रचून आलो मी….

आजचं वातावरण बघता अशीच काहीशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. ज्या वृक्षाच्या सावलीत लहानाचं मोठं झालो आपण, ज्या वृक्षाच्या सावलीत खेळलो आपण आणि शेवटी त्याचीच कत्तल करून स्वतःला मृत्यू च्या आघोशात ओढून घेतलो आपण. आपल्या मानवजातीला च नव्हे तर संपूर्ण सजीव प्राणीमात्रांना “ऑक्सिजन” या वायू ची नितांत गरज भासत असते. त्या वायू शिवाय जगणे माणसाला मुळीच शक्य नाही आणि म्हणून त्या वायू ला “प्राणवायू” म्हटले जाते. ते प्राणवायू जगातील कुठल्याच प्रयोगशाळेत तयार करता येत नाही तर ते वायू फक्त आणि फक्त वृक्षांच्याच माध्यमातून आपल्याला मिळत असते.

Zade Lava Zade Jagva Essay in Marathi Nibandh | झाडे लावा झाडे जगवा निबंध

एवढंच नव्हे तर आपल्या पृथ्वी ला प्रदूषित करणारे “कार्बन डायऑक्साइड” हे संपूर्ण मानवजातीला घातक असलेले वायू देखील वृक्ष स्वतःमध्ये शोषून घेते आणि पृथ्वी ला प्रदूषित होण्यापासून वाचवत असते. त्यामुळे वृक्षांची नितांत गरज आपल्या मानवजातीला आहे. प्राचीन काळापासून च झाडे हे मनुष्यांच्या उपयोगी येत आहेत. पूर्वी मानव हा जंगलामध्ये वस्ती करून राहायचा त्यावेळी त्याला अन्न, वस्त्र, निवारा हे त्या झाडांपासून च मिळवीत असत. तसेच प्राण्यांची शिकार करण्यासाठी सुरवातीचे हत्यारे सुद्धा हे झाडांपासून च तयार झालेली असायची. आणि आजच्या काळातही झाडांपासून रबर, माचिस, कागद अशा अनेक वस्तू झाडांपासून च तयार होत आहेत. याशिवाय कित्येक वनस्पती पासून औषधी सुद्धा तयार केली जाते.

सुनामी, भूकंप, वादळ, पुर अशा अनेक नैसर्गिक आपत्तीस आज निसर्ग जबाबदार नसून मानव च जबाबदार आहे. जिकडे तिकडे वृक्षतोड होत असल्यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत चालली आहे. त्यामुळे अशा नैसर्गिक समस्येशी सामना करावा लागत आहे. हे सर्व वाचविण्यासाठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात होणारी तोड आता बंद व्हायला पाहिजे आणि अधिक झाडे लावून जमिनीची धूप होण्यापासून थांबवणे गरजेचं आहे. कारण जर हे असेच चालू राहिले तर एक दिवस संपूर्ण पृथ्वी संपुष्टात येईल.

Zade Lava Zade Jagva Essay in Marathi Nibandh | झाडे लावा झाडे जगवा निबंध | Zade Lava Zade Jagva Marathi Nibandh

अत्याधिक लोकसंख्या आणि वाहनांची वर्दळ अधिक वाढल्यामुळे प्रदूषण आणखी दूषित होत जात आहे आणि त्यामुळे ओझोन लेअर सुद्धा कमी होत आहे. त्यामुळे कर्क रोग, त्वचा रोग असे आजार होत आहेत. याशिवाय लोकं दमा सारख्या आजारांनी बळी पडत आहेत. सुनामी, भूकंप, पूर अशा अनेक नैसर्गिक समस्येशी झुंज द्यावी लागत आहे. ऋतू अनियंत्रित होत आहे त्यामुळे कधी तर कडाक्याची उन्ह लागते तर कधी मुसळधार पाऊस पडते आणि याचा थेट शेतकऱ्यांना सुद्धा फटका बसत आहे. यांना वेळीच आळा बसला नाही तर एकदिवस संपूर्ण पृथ्वी नष्ट होईल. यासाठी एकच उपाय म्हणजे अधिकाधिक झाडे लावा आणि त्यांना जगवा.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ।
पक्षी ही सुस्वरे आळविती ॥१॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.

वरील अभंगामधून जगतगुरु संत तुकोबाराय आपल्याला हे सांगतात की, वृक्ष हे आपले सगे सोयरे आहेत कारण ते आपले संरक्षण करीत असतात. त्यामुळे एका माणसाने एक तरी झाड लावा आणि नुसतं लावून ही उपयोग होणार नाही तर त्याला जगवा सुद्धा जेणे करून आपल्याला निसर्गामुळे होणाऱ्या समस्या होणार नाही आणि आपले जीवन हे आनंदात जाईल.

वाचा Petrol Sample tr Nibandh In Marathi

गायीवर मराठी निबंध वाचा

Zade Lava Zade Jagva English मध्ये कसे लिहितात ?

“Plant Tree, Save Tree” . Its meaning is you should take care of trees by stop chopping them and increase their number by tree plantation.

Author

Marathi Time

Leave a Comment