Savitriba Fule Information in Marathi
सावित्रीबाई फुले यांना पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्या थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ तसेच त्या कवयित्री सुद्धा होत्या. त्यांनी पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांच्या अधिकारासाठी काम केले आहे. यासोबत च त्यांनी जात आणि धर्म भेद मुळे जो अन्याय होत होता त्याच्या विरुध्द काम केले आहे. त्यांनी अनेक पुस्तके तसेच कविता यांचं लेखन केलं आहे. सावित्रीबाई फुले यांना भारतीय स्त्रीवादाची जननी म्हणतात.

सावित्रीबाई फुले यांचे जीवन
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ०३ जानेवारी इ. स. १८३१ मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला. नायगाव हे शिरवळ पासून 5 किलोमिटर अंतरावर आहे तर पुणे पासून सुमारे 50 किलोमिटर अंतरावर आहे. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई नेवसे तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. खंडोजी नेवसे हे नायगाव चे पाटील होते. सावित्रीबाई फुले या खंडोजी नेवसे पाटील यांची मोठी कन्या होती. ते माळी समाजाचे होते. त्यावेळी वंचित आणि मागासवर्गीय लोकांना शिक्षणाचा अधिकार नसल्यामुळे सावित्रीबाई फुले यांना शाळेत कधीच जाता आलं नाही.
त्यामुळे त्या निरक्षर होत्या त्या काळी बालविवाह ची परंपरा असल्यामुळे सावित्रीबाई फुले या नऊ वर्षाच्या असतांना इ. स. १८४० मध्ये त्यांचा विवाह १३ वर्षाचे असणाऱ्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिराव फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. ज्योतिराव फुले हे नऊ महिन्यांचे असतांनाच त्यांची आई चिमणाबाई यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा पालनपोषण त्यांची मावस आत्या सगुणाबाई यांनी केले.
Savitriba Fule Information in Marathi | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी निबंध
संगुणाबाई ह्या एका इंग्रजाच्या मुलाच्या दाई होत्या. त्यांना इंग्रजी समजत होती आणि त्यांना बोलताही येत होते. ज्योतिराव फुले हे फार वैचारिक, समाजसुधारक तसेच लेखक सुद्धा होते. मुलींना शिक्षणाच्या अधिकार नसल्यामुळे सावित्रीबाई या निरक्षर होत्या आणि ज्योतिराव हे पुरोगामी विचारांचे होते त्यामुळे लग्न झाल्यानंतर त्यांनीच सावित्रीबाई यांना घरीच शिक्षण देण्यास सुरवात केली. त्यावेळी स्त्रियांना शिक्षण देणे हा फार मोठ्ठा पाप मानला जात होता. त्यामुळे ज्योतीरावांना लोकांनी विरोध करण्यास सुरवात केली मात्र ज्योतिराव विरोधाला न घाबरता शिक्षण चालू ठेवले. सावित्रीबाई आणि सगुणाबाई या दोघी ज्योतिरावांना शेतात भोजन देण्यासाठी जात होते तेव्हा शेताच्या मागे एक आंब्याचा झाड होता.
त्या आंब्याच्या बारीक काडीला पेन बनवून माती मध्ये अक्षर लिहून त्या दोघींना अक्षरांची तोंड ओळख करून देऊ लागले. त्यावेळी याची कुणाला कल्पनाही न्हवती की एका मातीवर कोरलेल्या अक्षारांमधून एक तेजस्वी अग्नी जन्माला येईल. अहमदनगर मध्ये अमेरिकन मशिनरी च्या सहकार्याने जोतिबांनी एक महिलांसाठी शाळा काढण्याची कल्पना त्यांच्या वडिलांकडे माडली तेव्हा त्यांच्या वडिलांनी ज्योतिराव आणि सावित्रीबाई या दोघांना हि घराबाहेर हाकलून दिलं.
Savitriba Fule Information in Marathi | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी निबंध
सावित्रीबाई फुले यांचे समाजकार्य
ज्योतिरावांनी फक्त सावित्रीबाईंना च शिक्षित केलं नाही तर त्यांच्या मावस आत्या यांना सुद्धा शिक्षित केलं. आणि त्यांच्यासाठी सावित्रीबाई यांनी ०१ मे इ. स. १८४७ रोजी सगुणाबाई यांच्यासाठी मागास लोकांच्या वस्तीत एक शाळा बांधून दिली. सावित्रीबाईंनी काढलेली ही पहिली शाळा होती. त्या शाळेत सगुणाबाई यांना बोलवण्यात आले आणि सगुणाबाई हे सुद्धा आनंदाने त्या शाळेमध्ये शिकवू लागले. पुढे ही शाळा बंद पडली. नंतर ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी पुणे मध्ये बुधवार पेठेत भिडेवाडा येते ०१ जानेवारी इ. स. १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा काढली.
मनुवादी वर्ण व्यवस्थेला न जुमानता सावित्रीबाईंनी पुढे शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून काम केले. त्यांना या कामात फातीमा शेख यांचंही फार मोठे योगदान लाभले. पुढे चार वर्षात त्यांनी १८ शाळा काढल्या आणि चालवल्या. प्रथम त्यांच्या शाळेत फक्त ५ ते ६ च मुली शिक्षणासाठी येऊ लागल्या मात्र एक वर्षातच मुलींचा आकडा ४० ते ४५ च्या पार गेला.
शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी प्रथम स्त्रियांचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे असे त्यांना वाटू लागले त्यामुळे सावित्रीबाई शिक्षणासोबतच इतर सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम करू लागले. त्यावेळी बाल विवाह प्रथा होती त्यामुळे कित्येक मुली १२ ते १३ वर्षाचे असतांनाच विधवा व्हायच्या आणि विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करण्याचा सुद्धा अधिकार न्हवता. विधवा झाल्यानंतर त्यांना एकतर सती जावे लागे किव्वा मग त्यांना केशवपन करून कुरूप बनविले जाई.
Savitriba Fule Information in Marathi | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी निबंध
मग अशा कुरूप झालेल्या विधवा स्त्रिया एखाद्या नराधमांच्या शिकार होत आणि मग विधवा गरोदर म्हणून समाज त्यांचा छळ करेल आणि होणाऱ्या मुलांनाही यातनेशिवाय काहीच मिळणार नाही या मुळे त्या विधवा आत्महत्या करीत किव्वा मग भ्रूणहत्या करीत असत. हे ओळखून ज्योतिराव यांनी बालहत्या प्रतीबंधक गृह सुरू केले आणि ते सावित्रीबाईंनी चालविले. फसलेल्या गरोदर स्त्रियांचे बाळंतपण करून त्यांच्या बाळांचा आपल्या मुलांसारखं संगोपन सावित्रीबाईंनी केले. याच ठिकाणी काशीबाई या ब्राम्हण महिलेचे बाळ दत्तक घेऊन त्यांचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन ची प्रथा बंद करण्यासाठी सावित्रीबाईंनी नाभिक समाजातील लोकांचं प्रबोधन केलं आणि संप घडवून आणला. तसेच पुनर्विवाह चा कायदा व्हावा यासाठी सुद्धा प्रयत्न केले. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंनी आपला हातभार लावला. १८९० मध्ये जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले तेव्हा सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची धुरा सांभाळली. पोटासाठी शरिरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दृष्टांच्या तावडीतून सोडवून आपल्या सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठविले. त्यांच्या या कार्याला पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी ही आपला हातभार लावला.
सावित्रीबाई यांचा मृत्यू
इ. स. १८९६ ते ९७ साली पुण्यामध्ये प्लेगची साथ आली. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना जबरदस्तीने वेगळं करून ठेवलं. त्यांचे होणारे हाल पाहून सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला आणि त्यात सावित्रीबाई यांनी प्लेग पीडितांना आणि त्यांचा कुटुंबांना आधार दिला मात्र प्लेग पीडित लोकांची मदत करता करता सावित्रीबाईंना सुद्धा प्लेग झाला आणि १० मार्च इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई यांनी आपल्या विचारांचा प्रसार साहित्याच्या माध्यमातून केला होता. त्यांचे अनेक साहित्य प्रकाशित झालेले आहेत.
Savitriba Fule Information in Marathi | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी निबंध
सावित्रीबाईंचे प्रकाशित साहित्य
काव्यफुले (काव्यसंग्रह)
सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
सुबोध रत्नाकर
बावनकशी
जोतिबांची भाषणे (संपादिका : सावित्रीबाई फुले १८५६)
संत ज्ञानेश्वरांवर मराठी माहिती वाचा